तीसहजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

तीसहजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

वृत्तवेध ऑनलाईन।Tue 22Sep20
By: Rajendra Salkar, 19.50

कोपरगाव : सेवानिवृत्त झाल्यानंतर चार्ज क्लिअर करण्यासाठी मागितलेल्या लाचेप्रकरणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI) कोपरगाव, विलास चिमाजी कुसाळकर (५२) भांडारपाल (Storekeeper) , वर्ग- 3, . घर नं १२२ , साईलिला हौ.सोसा. समतानगर ,यांना तीस हजाराची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांचे सासरे हे ऑगस्ट २०१८ मध्ये शासकीय आय टी आय, कोपरगाव येथुन भांडारपाल या पदावरून सेवानिवृत्त झाले होते.
त्यांनी भांडारगृहाचा चार्ज देताना काही वस्तु कमी असल्याचे कारण सांगून त्यांचे सेवानिवृत्ती नंतर नियमानुसार मिळणारे आर्थिक लाभ ,पेन्शन , सातवे वेतन आयोगाचा फरक रोखुन धरण्यात आले होते.
तक्रारदार यांनी त्यांचे सासरे यांचे सह यातील आरोपी लोकसेवक यांची भेट घेतली असता त्यांनी गहाळ वस्तू बाहेरून खरेदी करुन आणुन व ५००००/- रु दिल्यास त्यांचा चार्ज क्लिअर करुन वरिष्ठांना तसे प्रमाणपत्र देतो असे सांगितले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र.वि अहमदनगर यांचे कडे दिलेल्या तक्रारीवरून दि १८ सप्टेंबर रोजी कोपरगाव आय. टी. आय. कार्यालयात आयोजित लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक यानी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष लाचेची मागणी करुन रु ३००००/- स्विकारण्याची तयारी दर्शवली.
त्यानुसार आज २२ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक शाम पवरे, ला.प्र.वि अ’ नगर.यांच्या पुणतांबा चौफुली येथील हॉटेल आनंद परमीटरुम समोर आयोजित सापळा लावण्यात आला.
दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष रु ३००००/- लाच तक्रारदार यांचेकडून स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

पर्यवेक्षण अधिकारी हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि,अ’ नगर,सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी
शाम पवरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि अ’ नगर.,सहा. सापळा अधिकारी
दिपक करांडे, पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि अहमदनगर,सापळा पथक पो. हवा. तन्वीर शेख, पो. ना. प्रशांत जाधव, पो.ना. विजय गंगुल, पो. शि. रविंद्र निमसे, वैभव पांढरे , म.पो.शि. राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक पो. हवा. हरुन शेख, अशोक रक्टाटे. यांनी कारवाई केली.आरोपीचे सक्षम अधिकारी सहसंचालक, व्यवसाय प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, नाशिक. कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

Leave a Reply

You cannot copy content of this page