साई नगर मध्ये दोन गटात हाणामार्‍या १५ जणांवर गुन्हे दाखल

साईनगरमध्ये दोन गटात हाणामार्‍या १५ जणांवर गुन्हे दाखल

वृत्तवेध ऑनलाइन। Wed23Sep2020
By:RajendraSalkar,15.30

कोपरगांव : शहरातील साईनगर भागात गायकवाड व गरुड कुटूंब मंगळवारी सायंकाळी ५ ते ५.३० वा.चे सुमारांस एकमेकांना भिडले. मागच्या भांडणाच्या कारणावरुन त्यांचेत आपसात वाद निर्माण झाले व त्याचे पयावसान भांडण व तुफान हाणामारीत झाले. हाणामारीत सर्रास लोखंडी गज, काठया,बाटल्या, कोयते,लाकडी दांडकेंचा वापर झाला. या प्रकारामुळे शांतताप्रिय असलेल्या सार्इनगरात घबराट निर्माण झाली पोलीसांनी प्राणघातक हल्ला झाल्या प्रकरणी दोन्ही गटावर परस्परविरोधी १५ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
साईनगर भागातील सोपान दगडू गायकवाड व जेऊर पाटोदा येथील मनिष दिलीप गरुड (२०) यांचेत मागे भांडण झाले होते या भांडणाचा राग येवून मनिष दिलीप गरुड व सोपान दगडू गायकवाड यांच्यात अज्ञात कारणामुळे साईनगर भागात भालेराव यांचे निवासस्थानासमोर भांडणे सुरु झाली. दोन्ही कुटूंबे मोठया संख्येने भांडणात उतरले यावेळी त्यांचे हातातील कोयता,लाकडी दांडके, विटाचे तुकडे,लोखंडी गज,दगडांचा यथेच्च वापर करुन एकमेकांनी मारहाण केली या मारहाणीत चार पाच जण जखमी झाले या प्रकरणी कोपरगांव पोलीसांनी सोपान दगडू गायकवाड व मनिष दिलीप गरुड यांच्या परस्पर विरोधी फिर्यादीवरुन एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले या गुन्हयात नितिन सोपान गायकवाड,शुभम सोपान गायकवाड,सोपान दगु गायकवाड सर्व रा. साईनगर, अनिल गणेश जाधव,सौरव गंगुले,सनी गायकवाड रा.गांधीनगर कोपरगांव तर दुसर्‍या गटातील सिद्धार्थ गरुड, योगेश गरुड, लखन उर्फ तुषार पठारे,मनिष गरुड, रोहित वानखेडे, गणेश गरुड, रितेश गरुड, सिद्धु शिरसाठ,अजय पठारे सर्व रा.जेऊर पाटोदा या आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणी कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरिक्षक राकेश मानगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ गायमुखे पुढील तपास करीत आहेत. वरील प्रकारामुळे मात्र सार्इनगर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page