नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी देणार ; बांधकाम मंत्री चव्हाण यांची आमदार काळेंना ग्वाही

नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी देणार ; बांधकाम मंत्री चव्हाण यांची आमदार काळेंना ग्वाही

Nagarmanmad Highway

वृत्तवेध ऑनलाइन।Wed23Sep20
By: Rajendra Salkar, 18.00

कोपरगाव :नगर-मनमाड हायवेची वास्तव समोर आणल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आमदार आशुतोष काळे यांना दुरुस्तीसाठी ४० कोटी रूपये निधी देणार असल्याची ग्वाही दिली आहे.

बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या दालनात बुधवारी (२३) रोजी बैठक पार पडली. कोपरगाव तालुक्याच्या शेजारी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिर्डी धार्मिक स्थळ आहे. शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अहमदनगर-मनमाड राज्य मार्गावर वाहनांची संख्या जास्त आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाण्यास विलंब होत असून अनेक गंभीर रुग्णांनी रस्त्यातच आपले प्राण सोडले असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले. पुणतांबा फाटा चौफुली येथे उड्डाणपूल करण्यात यावा. तसेच बेट नाका, श्री. संत जनार्दन स्वामी आश्रम येथे पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बांधण्यात यावा. येवला नाका व श्री साईबाबा कॉर्नर येथील वाहतूक कोंडीचा आढावा घेऊन त्याठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या आणि सदर मार्गावर गरजेच्या ठिकाणी सेवा मार्ग (सर्व्हिस रोड) काढण्यात यावे अशा सूचना मांडली. त्याबाबत आपण लवकरच निर्णय घेवू असे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सांगितले असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.                    

Leave a Reply

You cannot copy content of this page