गोदावरी नदीपात्रात तरुणाची आत्महत्या

गोदावरी नदीपात्रात तरुणाची आत्महत्या

वृत्तवेध ऑनलाइन।Thu24Sep2020
By: Rajendra Salkar, 15.00
कोपरगांव : शहरातील सुभाषनगर येथील वाल्मिक दगडू आवारे (३४) या तरुणाने गोदावरी नदीपात्रात आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. नदीकाठालगत असलेल्या दत्तपाराजवळ सदर इसमाचा मृतदेह आढळून आला. आत्महत्ये मागचे कारण कळु शकलेनाही. सदर तरुण हा नगरपरिषदेत कांही महिन्या पूर्वी आरोग्य विभागात कर्तव्यावर होता त्यामुळे नगरपरिषदेत कामावर असलेल्या कर्मचार्‍यांचा हा आठ महिन्यात तिसरा मृत्यू ठरला आहे. मयत आवारे हा दोन दिवसापासून बेपत्ता होता (२४ सप्टेंबर) रोजी सकाळी ७.३० वा. नदीपात्रालगत तो मृतावस्थेत आढळला त्याचे मागे आई,  वडिल,पत्नी,भाऊ  तीन मुली  एक मुलगा असा परिवार आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पो.हे.कॉ एस एच गायमुखे पुढील तपास करीत आहेत. 

Leave a Reply

You cannot copy content of this page