फक्त १४ गावांचेच पंचनामे अन्यायकारक; सरसगट पंचनामे व भरपाई दया – सौ. स्नेहलता कोल्हे

फक्त १४ गावांचेच पंचनामे अन्यायकारक; सरसगट पंचनामे व भरपाई दया – सौ. स्नेहलता कोल्हे

वृत्तवेध ऑनलाईन। Thu24Sep20
By: Rajendra Salkar, 19.30

कोपरगाव : सातत्याने कोसळणा-या अतिवृष्टीमुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्वच शेतकरी-याची उभी पिके जमीनदोस्त झाली आहे. अशा परिस्थितीत फक्त १४ गावांचेच पंचनामे हे अन्यायकारक असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तेंव्हा आता सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सरसगट पंचनामे करून सरसगट भरपाई दयावी अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नहेलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषीमंत्री, जिल्हयाचे पालकमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, वादळी पावसामुळे शेतातील उभी पिके, मका,कपाशी, बाजरी, सोयाबीन, कांदारोपे, या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, पावसाच्या तडाख्यामुळे उभी असलेले पीके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे. त्यात अंजनापुर, बहादरपुर, धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, वेस, सोयेगांव, रांजणगांव देशमुख, काकडी मल्हारवाडी , डांगेवाडी, मनेगांव या भागातील शेतक-यांनी संपर्क कार्यालयात समक्ष येवुन नुकसान भरपाई मिळावी म्हणून लेखी मागणी केलेली आहे.

हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून नेला आहे . तेंव्हा शासन स्तरावरुन त्वरीत मतदारसंघातील सर्वच नुकसानग्रस्त शेतक-यांना भरपाई मिळवुन देण्यासाठी संबधित कार्यान्वीत यंत्रणेस आपले त्वरीत आदेश व्हावेत अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page