कोपरगाव भाजपा संपर्क कार्यालयात पंडीत दिनदयाळ उपाध्याय जयंती साजरी
Pandit Dindayal Upadhyay Jayanti
वृत्तवेध ऑनलाईन। Fir25Sep2020
By:Rajendra Salkar, 17.30
कोपरगाव : २५ सप्टेंबर १९१६ रोजी जन्माला आलेले आदर्श थोर समाजसेवक, अर्थतज्ञ, पत्रकार शेवटच्या घटकापर्यंत काम करणारे महापुरूष भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती प्रदेशसचिव व माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात शनिवारी साजरी करण्यात आली.
यावेळी भाजप माजी जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र बोरावके, जिल्हा प्रतिनिधी शरद नाना थोरात, बाळासाहेब नरोडे, तालुका अध्यक्ष साहेबराव रोहोम, शहर अध्यक्ष कैलास खैरे, युवामोर्चा जिल्हाउपध्यक्ष सुशांत खैरे, युवामोर्चा अध्यक्ष वैभव आढाव, नगरसेवक स्वप्नील निखाडे, बाळासाहेब केकाण, गोपी गायकवाड, सतीश रानोडे, जगदीश मोरे, रोहन दरपेल, दिनेश गाडेकर आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थीत होते.
ॲड. रविकाका बोरावके म्हणाले, पंडीत उपाध्याय यांची त्या काळातील प्रॉर्पटी म्हणजे एका पिशवीत फक्त दोन ड्रेस ते घरदार प्रपंच किंवा कोणत्याही नातेवाईकामध्ये गुरफटले नाही. त्या काळातील कम्युनिझम विचार, साम्यवाद, भांडवलदार शाहीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसंघाची स्थापना होत असतांना उडी घेतली. पहिले भाजपाचे अध्यक्ष म्हणुन शामाप्रसाद यांची वर्णी लागली. त्यावेळी पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांनी सरचिटणीस म्हणुन काम पाहिले.
या थोर पुरूषामुळेच आज केंद्रामध्ये भाजपाची सत्ता पाहावयास मिळत आहे. या लोकांनी शेवटच्या घटकापर्यत कामे व्हावे, प्रत्येकाला घर मिळावे, प्रत्येकाच्या बँक खात्यावर पैसे मिळावे याची अंमलबजावणी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
यावेळी साहेबराव रोहोम यांचे भाषण झाले तर सुत्रसंचलन सुशांत खैरे यांनी केले तर कैलास खैरे यांनी आभार व्यक्त केले.





