महिला बचत गटांना सहा लाखाचे कर्ज वाटप

महिला बचत गटांना सहा लाखाचे कर्ज वाटप

Women’s self-help group

जिल्हा बँक शाखा अधिकारी गौतम नगर सुनील गाडे महिला बचत गटांना धनादेश वाटप करताना

वृत्तवेध ऑनलाईन। Fir25Sep2020
By:Rajendra Salkar, 17.00

कोपरगाव : प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व जिल्हा बँक संचालक सौ.चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटांना नुकतेच सहा लाख रुपयांचे कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेचे गौतमनगर शाखाधिकारी सुनील गाडे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.

सुनील गाडे म्हणाले , घेतेलेले कर्ज सत्कारणी लावून आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून बँकेकडे आपल्या बचत गटाची पत वाढवा असे आवाहन त्यांनी केले .

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वच आर्थिक क्षेत्राच्या नाड्या आवळल्या गेल्या आहेत.मात्र अशा परिस्थितीत सौ. पुष्पाताई काळे यांनी बचत गटाच्या महिलांना सहा लाखाचे कर्ज वितरण करून आर्थिक संकटात मदतीचा हात दिला आहे. गौतमनगर येथील कर्मवीर शंकरराव काळे सभागृहात पार पडला.

यावेळी श्री.दत्त सागर, साई अमृत, वैष्णवी मॉ, कृष्णा, सप्तशृंगी व ओम साई आदि बचतगटांना धनादेश देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक जयपाल जाधव, अनिल पवार आदींसह बचत गटाच्या महिला सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होत्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page