या हंगामात व्यावसायाची चांगली संधीही आहे ; परंतु नियम पाळा, आरोग्य अबाधित ठेवा -आ. आशुतोष काळे
वृत्तवेध ऑनलाईन। Sat26Sep2020
By:RajendraSalkar,17.30
कोपरगाव: चालू गळीत हंगामात कार्यक्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणावर ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे या हंगामात व्यावसायाची चांगली संधीही आहे, परंतु नियम पाळा, आरोग्य अबाधित ठेवून चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून कंपनीस व शेतकी खात्यास सहकार्य करावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे कारखाना चेअरमन तथा आमदार आशुतोष काळे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.
गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगर ची ४९ वी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचा अवलंब करून व सोशल डीस्टन्सिंग ठेऊन नुकतीच कंपनीचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
आशुतोष काळे म्हणाले, मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना उन्हाळ्यात देखील शेतीसाठी आवर्तने मिळाल्यामुळे यावर्षी मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध असला तरी अडचणी व नवीन आव्हाने देखील येत असतात. यावर्षी इतर अडचणी सोबतच जागतिक कोरोना संकटाचे सावट असल्यामुळे काळजी घ्यावी लागणार असून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी गोदावरी खोरे व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीने बदलत्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे .
सभेचे प्रास्तविक गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जनरल मॅनेजर सोपानराव डांगे यांनी केले तर आभार संचालक विजय जाधव यांनी मानले.
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक छबुराव आव्हाड, कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, विश्वासराव आहेर, ज्ञानदेव मांजरे, सुनील शिंदे, काकासाहेब जावळे, कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, गौतम केनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर भिकाजी सोनवणे, कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे व सभासद सोशल डीस्टन्सिंग ठेऊन उपस्थित होते.