फळपिक विमा ; द्राक्ष व आंबा उत्पादकांच्या खात्यात साडेदहा लाख जमा –आ. आशुतोष काळे

फळपिक विमा ; द्राक्ष व आंबा उत्पादकांच्या खात्यात साडेदहा लाख जमा –आ. आशुतोष काळे

Mango Grape Crop Insurance

डाळींब उत्पादकांनाही लवकरच विम्याची रक्कम मिळणार

डाळींब

वृत्तवेध ऑनलाइन। Thu 29Sep20
By: Rajendara Salkar, 15.30

कोपरगाव: सुस्तावलेल्या विमा कंपन्यांना सरकारने कडक शब्दात समज दिल्यामुळे या कंपन्या सुतासारख्या सरळ झाल्या असून या कंपन्यांनी हवामान आधारित फळपिक विमा घेतलेल्या द्राक्ष व आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर १० लाख ५५ हजार ५१८ रुपये जमा केले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

आमदार काळे यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. दादा भुसे व पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुराव्यामुळे आजपर्यंत कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना २०१९/२० चे ठिबक सिंचनचे एक कोटी चोवीस लाख लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा, मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी १९.६७ कोटी भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे. पंतप्रधान पिक विमा योजना असेल किंवा हवामान आधारित फळपिक विमा असेल या कंपन्यांना शासनाने शेतकऱ्यांची देणी तातडीने द्या अशी तंबी दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची थकीत देणी देण्यावाचून या कंपन्यांना गत्यंतर राहिलेले नव्हते.
डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना देखील लवकरच विम्याची रक्कम मिळणार असल्याचे आ.काळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page