आता ‘या’ अधिका-यालाच करोनाची लागण; पालिका कार्यालय बंद
वृत्तवेध ऑनलाइन। Wed 30Sep2020
By : Rajendara Salkar, 17.00
कोपरगाव : सुमारे सात महिने करोना योध्याच्या भूमिकेत कोपरगाव शहरवासीयांना करोनापासून वाचविण्यासाठी अविरत कार्यमग्न असलेल्या कोपरगाव मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनाच अखेर करोनाने गाठले. असून बुधवारी (३०) सकाळी त्यांना करोना अहवाल बाधित आल्याने त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. पालिकेतील अजून दोन अधिकार्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे हे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कोपरगाव शहरवासीयांना करोनापासून चार हात लांब ठेवण्यासाठी करोना योध्याच्या भूमिकेत आपल्या कर्मचाऱ्यांसह अविरत कार्यरत आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांना घशात दुखत असून तापही येत होता.त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. तसेच त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना बुधवारी घेऊन तो तपासला असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले. दरम्यान, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व आणखी दोन अधिकारी यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच नगरपालिकेचे कार्यालय चार दिवसासाठी बंद करण्यात आले आहे . तसेच त्यांचा रोज संपर्कात येणाऱ्या अधिकारी , कर्मचारी आणि नगरसेवकांना क्वारंटाइन करावे लागणार आहे. यासाठी याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.
गेल्या सुमारे सात महिन्यापासुन ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेत अविरत कार्यरत होते. त्यामुळे दगदग व धावपळ झाल्याने ताप आला असावा म्हणून त्यांनी घरीच उपचार सुरू केले होते. मात्र त्यांनी त्यांची करोना टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे.
पालिका प्रशासनात घबराट पसरली आहे. त्यांचा रोज संपर्कात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांना क्वारंटाइन करावे लागणार असल्याने यासाठी सरोदे कोरोना बाधित कसे झाले. त्याची माहिती घेत आहोत. ट्रॅव्हल हिस्ट्री काढण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर अधिक स्पष्टता होईल. त्यांच्या सहवासातील लोकांना क्वारंटाइन करावे लागणार आहे. त्यांच्या घरी, कार्यालयातील त्यांच्या नेहमीच्या सहवासातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे,