मालकाच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेची चोरी ; सेल्स मॅनेजरवर गुन्हा दाखल

मालकाच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेची चोरी ; सेल्स मॅनेजरवर गुन्हा दाखल

वृत्तवेध ऑनलाइन ।Fir 2 Oct 2020
By:RajendraSalkar,17.00

कोपरगाव : अश्वमेध अग्रो केमीकल्सने सेल्स मॅनेजर अजय प्रभाकर गंपावार (४४) वर्षे रा.प्लॉट नं.४९ प्लॅट नं.३०३ राजराम निवास अपार्टमेंट उमरेड रोड गोटमारे हार्डवेअर,राहुलनगर,दिघोरी
हुडकेश्वर,बीके नगर नागपुर यांच्याविरोधात अश्वमेध कंपनीचे मालक डॉ. ज्ञानेश्वर रामनाथ वाघचौरे (४८) वर्षे धंदा- व्यापार रा- घर नं.४ भामानगर येवला रोड यांनी शुक्रवारी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३८१, ४०८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

गंपावार हा अश्वमेध कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कामासाठी असताना त्यास कंपनीने वापरणेसाठी दिलेल्या १३,२४००० रु.किंमतीच्या वस्तु त्यात एक लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, एमएच-१७-बीएक्स-२१७१ होंडा कंपनीची कार,मोबाईल सिम कार्ड ८४११८८७०२१ असे त्यास कंपनीने काढुन टाकलेनंतर कंपनीस परत न करता स्वता:चे फायदयाकरीता घेवुन गेला आहे. तसेच कंपनीचे विक्री प्रतिनिधीचे सेल्स ऍ़ग्रीमेंट संदर्भातील व आरोपीस दिलेल्या ऍ़पॉईटमेंट लेटर असलेली कागदपत्रांची ऑफिसमध्ये ठेवलेली फाईल चोरुन नेली आहे. वगैरे मााचे फिर्याद वाघचौरे यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये गंपावार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्या आधारे गंपावारवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३८१ व ४०८ नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.दिपक बोरसे करीत आहे.

कारावासाची तरतूद
भारतीय दंड संहितेच्या कलम ३८१ नुसार जो कोणी लिपीक किंवा नोकरदार असला किंवा लिपिक किंवा नोकर म्हणून नियुक्त झाला असेल त्याने आपल्या मालकाच्या किंवा मालकाच्या ताब्यात असलेली कोणतीही मालमत्ता चोरून नेल्यास त्याला मुदतीसाठी तुरूंगात डांबले जाईल ज्या शिक्षेसाठी त्याची शिक्षा सात वर्षांपर्यंत वाढविली जाऊ शकते आणि आर्थिक शिक्षेसाठीही तो जबाबदार असेल.
भारतीय दंड संहितेच्या कलम ४०८ नुसार जो कोणी लिपीक किंवा नोकर म्हणून नोकरी करतो किंवा लिपिक किंवा नोकर आहे त्याने कोणत्याही मालमत्तेशी संबंध ठेवला असेल किंवा मालमत्तेवर वर्चस्व राखले असेल तर त्या मालमत्तेसंदर्भात विश्वासाचा भंग केला असता आहे, तर मग त्याला सात वर्षांची मुदत असू शकते.

Leave a Reply

You cannot copy content of this page