कत्तलीसाठी गाईची वाहतूक करणारे दोन टेम्पो पकडले

कत्तलीसाठी गाईची वाहतूक करणारे दोन टेम्पो पकडले

३ लाख ६७ हजाराचा मुद्देमाल जप्त तीन आरोपींना अटक

वृत्तवेध ऑनलाईन ।Fir1Oct2020
By:RajendraSalkar,17.00

कोपरगाव : सहा जर्शी गायी कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो क्र. एम एच १५ ईजी ००२४ व क्र. एम एच २० डीई ६५०४ हे दोन टेम्पो सहा जर्सी गायी सह शहरात पकडून जप्त करण्यात आले. तीन जणांना अटक करण्यात आली आहे, कोपरगाव शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

कोपरगाव शहरातुन कत्तलीसाठी गाईंची वाहतूक होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. २ ऑक्टोबर सकाळी साडेपाच वाजता यातील आरोपी दिपक शिवाजी निंबाऴकर (२५) रा करंजी ता निफाड जि नाशिक, साजीद इसा कुरेशी (२८)रा कागजीपुरा खुलताबाद जि. औरंगाबाद, अकिब सत्तार कुरेशी (१९) रा आएशा काँलनी कोपरगाव यांनी स्व:ताचे फायद्यासाठी गोवंश भाकड जनावरे यांना क्रुरपने वागणुक देवुन कत्तलीच्या उद्देशाने स्व:ताजवऴ जख्मी अवस्थेत बेकायदेशीर जवळ बाळगताना मिऴुन आला म्हणुन त्याचे विरुध्द पोका. २५११ सुरजकुमार जिवन अग्रवाल (३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवी ४२९ भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागवण्याचा अधि.१९६० चे कलम ११(१)(ह) व महा.प्रणी संर.का.व सुधारणा अधि.क.१९९५ चे कलम ५(ब) ९ प्रमाणे गुन्हा रजी. दाखल करण्यात आला आहे. एकुण ६ जनावरे त्यात ६ मोठ्या गायी न दोन पिक अप चारचाकी वाहन असे ३ लाख ६७ हजार रुपये माल पोलिसांनी जप्त केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page