ते २७३ निवारा सभासद झाले मालक ; ३५ वर्षांनी मिळाला ७/१२
वृत्तवेध ऑनलाईन। Sun4Oct2020
By:Rajendra Salkar,12.15
कोपरगाव : उता-यावर निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणून नोंद होती. सोसायटी बरखास्त होऊन चार-पाच वर्षे उलटले होते. तरी या उताऱ्यावर सोसायटीचे नाव होते.आज अखेर चेअरमन काका कोयटे यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात ७/१२ व ८ ड, उतारा वाटप केल्याने ३५ वर्षांनी ते २७३ निवारा सभासद घराचे मालक झाले आहेत.
रविवारी (४) रोजी सकाळी ९ वाजता निवारा हाऊसिंग सोसायटीच्या वतीने काका कोयटे यांच्या ‘काशिदा’ या बंगल्याच्या आवारात निवारा सोसायटीच्या सभासदांना सातबारा वाटप करण्यात आले. उतारा मिळाल्याने गेल्या ३५ वर्षांपासून सभासद म्हणून असलेले खरेदीदार खऱ्या अर्थाने आज घर मालक झाले. सोसायटीचे संस्थापक काका कोयटे यांच्या हस्ते स्वतःच्या नावाचे उतारे मिळताच सभासदांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
प्रारंभी कै. लक्ष्मीनारायण झंवर व देव सर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना काका कोयटे
म्हणाले, निवारा हाऊसिंग सोसायटी च्या रूपाने मी चाळीस वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न साकार करतांना आलेल्या कडू-गोड अनुभवांचा तसेच या प्रवासात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचा नामोल्लेख करून आठवणींना उजाळा दिला.
काका कोयटे पूढे म्हणाले, आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात निवारा सोसायटीच्या माध्यमातून झाली आहे. निवाराने मला एक ओळख दिली. आज आपण शहरासह राज्याच्या सहकार क्षेत्रात काम करीत असलो तरीही ज्यां निवारा सोसायटीने माझ्या राजकीय कारकिर्दीत मला भरभरून साथ दिली माझा प्रत्येक शब्द मानला, त्या निवार्याशी आपली नाळ जोडलेली आहे, व ती कायम तशीच राहील. लोकांना स्वतःच्या नावावर घरी हवे होते. अनेक अडचणी होत्या, परंतु माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मी त्या सोडविल्या, आज सभासदांना उतारा देत असताना मला मोठा आनंद होत आहे. त्यामुळे आमची घरे आमच्या नावावर कधी ? आमचे उतारे कधी मिळणार ? असे प्रश्न निर्माण करणारा छोटासा ठिपका आज पुसला गेला आहे. सभासदांना उतारे देताना मोठा आनंद होत आहे. प्रश्न सुटला असला तरी मी निवारा व त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो असेही ते शेवटी म्हणाले,