खडकी नाल्यावरील पुलाचे भगदाड बुजवा – प्रशांत रोहमारे
वृत्तवेध ऑनलाइन। Sat3Oct2020
By:RajendraSalkar,19.30
By:RajendraSalkar,19.30
कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव देर्डे-कोऱ्हाळे शिवावर असलेल्या खडकी नाल्यावरील पुलाचे भगदाड तातडीने बुजवा अशी मागणी उपसरपंच प्रशांत रोहमारे यांनी झेडपीचे मुख्याधिकारी जगन्नाथ भोर यांच्याकडे केली आहे.
खडकी नाल्यावरील पूल अतिवृष्टीच्या पावसाने खचुन भगदाड पडल्याने एक महिन्यापासून रहदारी पूर्णपणे बंद आहे. मात्र याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
कोळपेवाडी परिसराला जोडणारा पोहेगांव देर्डे कोऱ्हाळे हा मुख्य रस्ता असून दोन्ही गावच्या सीमेवर खडकी नाला आहे. आणि त्या नाल्यावर आधारण चाळीस वर्षांपूर्वी पुलाचे काम केले होते. सतत दोन वर्षापासून या परिसरात अतिवृष्टी होत असल्यामुळे व पुलाच्या कामाला जास्त दिवस झाल्यामुळे हा पुल खचून जाऊन पडला आहे. रस्त्यावरच पुलाला भगदाड पडल्यामुळे रहदारी पूर्णपणे बंद झाली आहे. चार चाकी वाहने व हेवी साधणे पुलावरून चालवणे शक्य होत नाही. सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे आपल्या या पुलाचे काम होणे अत्यंत गरजेचे असून जिल्हा परिषदेने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत या पुलाची पाहणी करून पुलाच्या कामासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन वाहन चालक शेतकरी व प्रवाशांची अडचण सोडवावी असे रोहमारे यांनी पत्रात म्हटले आहे.
Post Views:
483





