महाराष्ट्रावर सर्वाधिक कर्जबाजारी राज्याचा शिक्का बसलाय, तो पुसा -विवेक कोल्हे

महाराष्ट्रावर सर्वाधिक कर्जबाजारी राज्याचा शिक्का बसलाय, तो पुसा -विवेक कोल्हे

वृत्तवेध ऑनलाइन।MonOct5,2020
by:RajendraSalkar,16.00

कोपरगाव : देशातलं सर्वात जास्त औद्योगिक राज्य म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाराष्ट्रावर सर्वाधिक कर्जबाजारी राज्याचा शिक्का बसलाय. तो पुसण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाच्या नावानं शिमगा घालण्यापेक्षा महाराष्ट्रातील मंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाला सर्वाधिक गोळा होणाऱ्या महसुलाचा योग्य प्रकारे विनियोग करावा, असा टोला कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी चांदेकसारे येथील विविध कामाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

आनंदवाडी, दयानंदवाडी, झगडे फाटा व चांदेकसारे येथे बंदीस्त गटर व पथदिवे आदी ३४ लाख रुपये खर्च करून कामे पूर्ण करण्यात येणार आहे.

विवेक कोल्हे म्हणाले, मोदी सरकारने सन २०१४ साली सत्ता आल्यानंतर १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केला. केंद्र शासनाने घेतलेले या निर्णयामुळेच ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळाली. अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एल ईडी टिव्ही व अंगणवाडी केंद्रासाठी साहित्य व अंत्यविधी नंतर येणारा सर्व खर्च ग्रामपंचायतीने उचलून तालुक्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून चांदेकसारे ग्रामपंचायतीने ओळख निर्माण केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी सरपंच केशवराव होन, कोल्हे कारखान्याचे संचालक संजय होन, सरपंच पुनम खरात, उपसरपंच विजय होन,ॲड ज्ञानेश्वर होन, रावसाहेब होन, आनंदराव होन, अर्जुन होन, किरण होन, प्रशांत होन, प्रल्हाद होन,जे के होन, विलास होन, अजित होन, सुनील खरात, ग्राम विकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर,मलु होन अदी उपस्थित होते.

केशवराव होन म्हणाले, चांदेकसारे गावच्या विकासासाठी कोल्हे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली कुठल्याच प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. ग्रामस्थांना विकास कामे कोणी केली हे समजले आहे. कोरोना महामारीत चांदेकसारे ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती काळजी घेतल्यामुळेच आज गाव सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आभार ॲड ज्ञानेश्वर होन यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page