रविवारचा जनता कर्फ्यू मागे घेतल्याचा निर्णय झालाच नाही – तहसिलदार चंद्रे

रविवारचा जनता कर्फ्यू मागे घेतल्याचा निर्णय झालाच नाही – तहसिलदार चंद्रे

वृत्तवेध ऑनलाइन।MonOct5,2020 by:RajendraSalkar,18.30

तहसीलदारांना न विचारताच व्यापारी महासंघाची घोषणा, जनतेमध्ये संभ्रम अधिका-यांची तीव्र नाराजी

 

कोपरगाव: कोपरगाव शहरात रविवारी जनता कर्फ्यू करण्यात आला आहे. तो त्यापुढे ठेवायचे की उठवावयाचा याबाबत कुठलाही निर्णय झालाच नाही. असे स्पष्ट मत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

तहसीलदार चंद्रे म्हणाले, अशा प्रकारचे वृत्त कोण देतं ? आणि ते कसे छापले जाते ? आपण कुठलाही निर्णय दिलेला नसताना त्यामध्ये आपले नाव कसे छापले जाते ? याबद्दल त्यांनी तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे खोटे वृत्त देऊन अफवा पसरवू नका असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

एका वृत्तवाहिनीवर व्यापारी महासंघाचे सचिव यांच्या नावाचा हवाला देत महसूलच्या परवानगीने रविवार जनता कर्फ्यू मागे घेण्यात आला असल्याचे वृत्तप्रसिद्ध झाले. याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि, आपण याबाबत कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नाही व कुणालाही रविवारचा जनता कर्फ्यू मागे घेण्यात आल्याचे सांगितले नाही. असे असताना व्यापारी महासंघाने रविवारचा जनता कर्फ्यू मागे घेण्याच्या मागणीला महसुल यंत्रणेने मंजुरी दिली असल्याचे धाद्यांत खोटे छापले आहे. याबाबत संबंधितांना आपण चांगलेच झापले असून ज्यांनी तुम्हाला परवानगी दिली त्यांचे नाव छापा असे स्पष्ट सांगितले. असल्याचे तहसीलदार चंद्रे यांनी सांगितले.  इथे कोणीही कोणाला वाटेल तशा व त्या बातम्या देऊन मोकळे होतात विचारपूस व खात्री शहानिशा केली जात नाही हे म्हणजे अति झाले आहे अशा शब्दात त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.

तिकडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे हे कोवीड सेंटरमध्ये कोरोनाचा उपचार घेत आहे. याबाबत यांना विचारले असता ते म्हणाले, मला काही जणांनी विचारले होते. परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितले कि, याबाबत तुम्ही तहसीलदार योगेश चंद्रे साहेब यांच्याशी चर्चा करा, परंतु त्यांनी परस्पर वृत्त छापले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना मुख्याधिकारी सरोदे म्हणाले, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचाही याबाबत आपल्याला फोन आला होता. परंतु आपण त्यांनाही तहसीलदार यांच्याशी बोलण्याचे सांगितले होते . असे त्यांनी सांगितले.

कोरोना काळामध्ये जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासन तहसीलदार मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना लॉकडाऊन बाबत सर्व निर्णय घेण्याचे सर्वाधिकार बहाल केले आहेत. रविवारचा जनता कर्फ्यू मागे घेण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नसताना व्यापारी महासंघाने रविवारचा जनता कर्फ्यू मागे घेतले असल्याचे वृत्त देऊन कोपरगाव शहरातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page