इतिहासात पहिल्यांदाच कोटमगाव देवीचा यात्रोत्सव रद्द

इतिहासात पहिल्यांदाच कोटमगाव देवीचा यात्रोत्सव रद्द

ट्रस्टमार्फत भाविक भक्तांना ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणार

वृत्तवेध ऑनलाइन।Wed Oct7,2020
by: RajendraSalkar,17.30

 कोपरगाव :   राज्यासह देश-विदेशातील नागरिकांचे आराध्य दैवत असलेली श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती म्हणजेच नवसाला पावणारी जगदंबा देवी अशी ख्याती असलेल्या कोपरगाव पासून वीस किलोमीटर  अंतरावर येवला तालुक्यातील  श्री क्षेत्र कोटमगाव देवीचे येथील नऊ दिवसांचा शारदीय नवरात्रोत्सव  यावर्षी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर  इतिहासात पहिल्यांदाच  हा  यात्रोत्सव यावर्षी रक्त करण्यात आला आहे.  अशी माहिती जगदंबा  ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे  यांनी दिली. नवरोत्सवाच्या नऊ दिवसात हजारावर भाविक भक्त येथे घटी बसतात. नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे. कोरोनामुळे यात्रोत्सव रद्द करावा लागला असला तरी ट्रस्टमार्फत ऑनलाइन दर्शनाची सुविधा भाविक भक्तांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

१७ ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने बैठक बोलावण्यात आली होती. प्रशासकीय अधिकारी देवस्थान ट्रस्ट सदस्य ,ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ बैठकीला उपस्थित होते या बैठकीत चालू वर्षीची यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. प्रथेप्रमाणे देवीची विधिवत पूजा केली जाणार आहे. या यात्रोत्सवात उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातील भाविक येत असल्याने यात्रेच्या नऊ दिवसात करोडो रुपयांची उलाढाल होत असते, यात्रेच्या माध्यमातून अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना रोजगार मिळत असतो. कोटमगाव यात्रेचे खास आकर्षण म्हणजे मनोरंजनाची विविध साधने आकर्षक विद्युत रोषणाई व पोलिसांचा चोख बंदोबस्त येथील हॉटेल्स व विविध खेळण्यांचे स्टॉल व देवीपुढे होणारे जागरण गोंधळ कीर्तन प्रवचन जोगवा आरती आदी विविध कार्यक्रमाची मोठी रेलचेल असते देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून  नागरिक महिला लहान मुले मुली मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात गर्दीमुळे यात्रा ही प्रसिद्ध आहे.यात्रेत मोठ्या प्रमाणात महिला घटी बसत असतात या महिलांची फराळाची व राहण्याची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायत व देवस्थान तर्फे करण्यात येते.यात्रेच्या काळात सकाळ व संध्याकाळी पाच जणांचा उपस्थितीत आरती केली जाणार आहे.भाविक दर्शनासाठी जेथून येतात ती दोन्ही प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात येणार आहे. गावातही प्रवेश दिला जाणार नाही या बैठकीला येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी,नायब तहसीलदार राऊत, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष राऊसाहेब कोटमे,विश्वस्त भाऊसाहेब आदमणे,रामचंद्र लहरे,माजी सरपंच शरद लहरे,नानासाहेब लहरे,सतीश कोटमे,व्यवस्थापक राजेंद्र कोटमे,
पोलिस पाटील बाबासाहेब लव्हाळे,आप्पासाहेब चव्हाण,रोहित मढवई,इमाम काद्री,श्रावण ढमाले यांच्यासह  भाविक भक्त कार्यकर्ते  याप्रसंगी  उपस्थित होते .

Leave a Reply

You cannot copy content of this page