वाढदिवसानिमित्त कोरोनाशी झुंज देणाऱ्या रणरागीनी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांचे मनोगत

वाढदिवसानिमित्त
कोरोनाशी झुंज देणाऱ्या रणरागीनी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांचे मनोगत

वृत्तवेध ऑनलाइन।Thu Oct8,2020
By: RajendraSalkar,7.00

कोपरगाव : रडायचं नाही तर लढायचं असं सातत्याने म्हणत तमाम बंधू भगिनींना जगण्याची उभारी देउन आपल्या सामाजिक कार्यात जनहिताला प्राधान्य देणा-या कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या पहिल्या महिला आमदार सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना तातडीने उपचार करण्यासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु आपणास या आजाराने ग्रासले म्हणून न डगमगता त्या या आजाराला सामो-या गेल्या, तब्बल १७-१८ दिवसापासून कोरोनाशी झुंज देत असतांना परिवारातील माजी मंत्री आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब, सौ माईसाहेब यांच्या कोरोनाच्या चाचण्या निगेटीव्ह आल्याने समाधान वाटले, सन्माननीय बिपीनदादा यांनाही कोरोनाची लागण झाली, ते ही कोरोनामुक्त झाले, याचेही समाधान वाटले, या समाधानामुळेच मला कोरोनाशी लढण्याचे बळ मिळाल्याचे सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे म्हणाल्या.
कोरोना संसर्गामुळे रूग्णालयात असतांना विचारमंथन करायला अवधी मिळाला, या काळात मतदार संघातील जनता माझा परिवार असून त्यांच्या विषयीची आत्मीयता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, मध्यंतरीची ४-५ दिवस त्यांना आॅक्सीजन लावावा लागला, परंतु कोणत्याही प्रकारची भिती अथवा धास्ती त्यांना वाटली नाही. या काळात मतदार संघातील आणि मतदार संघाबाहेरील हजारो समर्थकांनी त्यांना चांगले आरोग्य, स्वास्थ लाभावे, या करीता पूजापाठ, प्रार्थना,आरती अशा विविध प्रकारे देवाचा धावा केला,हेे संदेश माइयापर्यंत पोहचले. सर्वांच्या सदिच्छा, सदभावना आणि वडिलधा-यांचा आर्शिर्वाद अशा प्रकारचा दुवा आणि दवा या दोन्हीही मोलाच्या ठरल्या. आॅक्सीजन लावून माझी कोरोनाशी झुंज सुरू होती, पण मी मनाशी निश्चय केला होता, शत्रुराष्ट्राच्या जैविक शस्त्रापुढे हार पत्करायची नाही तर कोरोनाला हरवुन यावर मात करून जनतेच्या सेवेसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यत मला लढा दयायचा आहे, हीच अंर्तउर्जा कोरोना विषाणूला हरविण्यासाठी मला सकारात्मक ताकद देत होती.
सामाजिक,राजकीय क्षेत्रातील आजपर्यंतच्या वाटचालीत माजी मंत्री आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब यांचे आशिर्वाद मान.बिपीनदादा यांचे पाठबळ नेहमी मिळतेच आहे, परंतु या राजकीय प्रपंचात अनेकांशी जीवाभावाचे नाते तयार झाले. कार्यकर्त्यामध्ये असलेली आत्मीयता,जिव्हाळा, प्रेम निर्माण झाले. हे नात्याचे बंध अधिकाधिक घटट होत असतांना कोणासाठी वहिनी, कोणासाठी ताई, कोणाची आई तर कोणासाठी माउली होता आलं., कधी सहकारी तर नेता आणि कार्यकर्ता अशा वेगवेगळया रूपातील नात्याचे बंध इतके मजबुत झाले, याचीही प्रचिती आली. या परिवारातील सर्वांचीच काळजी वाटत होती, आपण सर्वांनी काळजी घ्यावी म्हणून मी सांगत होते. आपल्याला आणखी काही करायचे आहे, अजुन प्रश्नसंपले नाही. सुमारे ९२ वर्षाचे साहेब जनेतसाठी लढत आहे, या वयातही काम करत रहा, कार्यरत रहा हा नेहमी साहेबांकडून मिळालेला सल्ला काम करण्याची शक्ती देतो. राजकारणातील जय पराजयाची मला फिकीर नाही, राजकारणाला फार कंगोरे असतात, माइया पराभवासाठी सर्व विरोधकांना एकत्र यावे लागले, तरीही जनता माइया पाठीशी राहिली, जनतेच्या प्रेमाचे अंकगणितात मुल्यमापन होत नाही, त्या किंमतीची कशाशीच प्रतारणा होउ शकत नाही. ही माइयासाठी अनमोल गोष्ट असुन मी सदैव ऋणी आहे. जी माणसे साहेब, दादांच्या, आमच्या सहवासात आली, त्यांच्याकडून मिळालेली आपुलकी आणि साथ अवर्णनीय आहे, अशी भेटलेली माणसे हीच ख-या अर्थाने संपत्ती आहे. या वैश्विक महामारीमुळे अनेकांना प्राणाला मुकावे लागले. आपल्यात वावरणारी जीवाभावाची माणसे सहजगत्या आपल्याला सोडून निघून गेली, अंत्यदर्शनालाही जाता आले नाही, याचे दुःखही खूप मोठे आहे.
सुमारे १७-१८ दिवसाचा कालावधी रूग्णालयात गेला, विचारमंथन करता आले, पुस्तके वाचनाचा पुर्वीपासूनचा असलेला छंद असल्याने या काळात अनेक पुस्तके वाचता आली. गत काळातील काही आठवणींना उजाळा मिळाला, बचत गटापासून सुरू केलेल्या सामाजिक कामामध्ये अनेक निरक्षर महिलांना समाजामध्ये पत आणि प्रतिप्ठा निर्माण करून देता आली, बचत गटाच्या या भगिनींना ख-या अर्थाने न्याय देण्याचे भाग्य माइया वाटयाला आले. अशिक्षित असुनही व्यवहार ज्ञानाबरोबर बॅंकेची ओळख करून देउन अशा महिलामध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकले, त्यांच्यातील आत्मबल वाढविता आले.,ही माइया आयुप्यातील सर्वात समाधानाची बाब आहे. महिला मंडळात काम करत करत विधीमंडळा पर्यन्त जाता आले, त्या माध्यमातून मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविता आले. कष्टकरी,शेतकरी, महिला, दिव्यांग, आदी समाज घटकासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत करता आली, त्यांच्या या पुण्याच्या कामात सहभाग देता आला. याचबरोबर प्रामाणिकपणे मतदार संघातील अनेक प्रश्नांना सोडविण्यासाठी झटले, यापुढेही झटत राहिल. कामे अजून संपलेली नाही, ते पुर्ण करण्यासाठी आपला लढा सुरूच राहिल. या कोरोनाषी लढाई संपून लवकरच नव्या दमाने मी आपल्या सेवेत हजर होईन. माजी मंत्री आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब कोणत्याच वादळाला घाबरले नाही, त्यांची सून असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
कोरोना सारख्या वैश्विक महामारीने जग,देश आणि राज्यात थैमान घातले. समाजातील कोणताही घटक यातुन सुटला नाही, प्रत्येकाला सामोरे जावे लागले. देशापुढे मोठे आर्थीक संकटही निर्माण झाले. आपल्या मतदार संघावरही या आजाराचा परिणाम झाला, अनेक निष्पाप बांधवाना जीव गमवावा लागला. त्यामुळे या महामारीपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित रहा, गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दीत जाणे टाळा, मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा. सोषल डिस्टन्सिंग पाळा, स्वतःला आणि परिवाराला जपा या निमित्ताने आवाहन करते.
दिवसागणिक कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ,ही आपणा सर्वांची चिंता वाढवणारी बाब आहे. प्रत्येकजण या आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही,याची काळजी घेत आहे. विविध सामाजिक संस्था, प्रशासन नागरीकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहे, त्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे काम आपल्याकडून होत आहे. त्यामुळे या संकटातून आपण लवकरात लवकर बाहेर पडू असा आत्मविश्वास आपणा सर्वांना आहेच.
नेहमीच सामाजिक जाणिवेचे भान ठेवून संकटकाळी मदतीसाठी पुढाकार घेणा-या सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी या कामातही स्वतःला झोकुन दिले. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष, श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीनदादा कोल्हे आणि कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या संकटकाळात गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला. संजीवनी उद्योग समुहाच्या सहकार्याने कोपरगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मतदार संघातील नागरीकांना सहकार्य केले.
सर्वप्रथम कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध गावांमध्ये औषधाची फवारणी केली. कोपरगाव नगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 350 आरोग्य कर्मचा-यांना काम करतांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरक्षा किटचे वाटप केले, यामध्ये बुट,चष्मा, हॅडग्लोज आणि संरक्षक कोटचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मतदार संघातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्रावर तेथील कर्मचा-यांना सुरक्षितेसाठी सोडियम हायपोक्लोराईड जंतूनाशके तसेच सँनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मतदार संघातील आर्थीक दुर्बल घटकातील नागरीकांना गहू, तांदूळ, आदी जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्यरत असलेल्या प्रशासन पातळीवरील महसूल, पोलीस, आरोग्य विभाग, विद्युत विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, डॉक्टर्स तसेच विविध सामाजिक संस्थाचे स्वयंसेवक, पत्रकार बांधव आदींसह गावखेडयात, वाडया वस्त्यांवर काम करणा-या आशा सेविकांच्या कामाची दखल घेऊन सातत्याने त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी संरक्षणाची साधने पुरवुन त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली. अत्यावश्यक सेवा देणा-या किराणा व्यावसायिक, रेशन दुकानदार,भाजीपाला विक्रेते यांनाही स्वसंरक्षणार्थ सँनिटायझर आणि मास्कचे वाटप केले. तसेच प्रशासनाच्या वतीने विलगीकरण कक्षात ठेवलेल्या संशयित रूग्णांची दररोजच्या जेवणाची व्यवस्था सुरू आहे. मतदार संघातील ग्रामपंचायत व नगरपालिका हद्दीतील कुटुंबांना तसेच श्री साईबाबा संस्थान , श्री साईबाबा इंटरन्ॉशनल एअरपोर्ट येथेही तेथील कर्मचा-यांना थर्मामीटर व कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क, सँनिटायझर दिले,
लॉकडाऊन च्या काळात रोजगार नसल्यामुळे अनेक कुटूंबाना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता, या काळामध्ये बचत गटातील महिलांना रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्जंतुक कापडी मास्क तयार करण्याचे काम सुरू केले,सुमारे ३ लाख मास्क तयार करण्यात आले. त्यामाध्यमातून अनेक महिलांना रोजगार देता आला. कोरोना संक्रमणाच्या काळात इतर आजाराच्या रूग्णांना तातडीची वौद्यकीय सेवा उपलब्ध करून देतांनाच अशा रूग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून विविध ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. स्वतः सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे, विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी रक्तदान करून या आदर्श कामात सहभाग नोंदविला.
जगभर या आजाराला थोपविण्याचे काम सुरू असतांना गावपातळीवर महत्वाची भुमिका बजावणारे कामगार पोलीस पाटील, सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक यांनाही सुरक्षेती साधने उपलब्ध करून दिली त्याचबरोबर देशसेवा करून आलेल्या सौनिक बांधवानी कोरोना काळात दिलेल्या सेवेचीही दखल घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी मास्क,सँनिटायझर देण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात विस्कटलेली घडी आणि निर्माण झालेल्या आर्थीक अडचणींमुळे नागरीकांना दिलासा मिळण्याच्या उद्देशाने माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पाटीच्या पदाधिका-यांनी शहरातील घरपटटी, पाणीपटटी माफ करावी, कर्जावरील व्याज माफ करावे तसेच वीजबिलेही माफ करण्यात यावे या आशयाचे निवदेन स्थानिक तहसिलदार यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे कोपरगाव नगरपालिका आरोग्य कर्मचा-यांना विमा सुरक्षा कवच देण्याची मागणी भाजपा पदाधिका-यांनी राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कोपरगाव दौ-याप्रसंगी निवेदन देऊन केली.
त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिनांक २१ जून २०२० रोजी कोपरगाव शहर व मतदारसंघात नागरीकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करून रक्तदान शिबीरे, आरोग्य तपासणी शिबीरे घेण्यात आली. याच कालावधीत मतदार संघामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांच्या घरात पाणी शिरले, दुबार पेरणीचे संकट शेतक-यांवर आले, सदर भागाला प्रत्यक्ष भेट देऊन या भागात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, त्यांना भरघोस मदत देण्याची मागणी केली, यावेळी अनेक नागरीकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले होते, अशा कुटूंबाची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
आजही कोरोना महामारीच्या संकटात हे मदतीचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आई
तुळजाभवानी आपल्याला उदंड निरोगी आयुष्य देवो !

Leave a Reply

You cannot copy content of this page