७/१२ उता-यावर पोट हिश्श्याची स्वतंत्र उल्लेख नोंद यावी – आ. आशुतोष काळे

७/१२ उता-यावर पोट हिश्श्याची स्वतंत्र उल्लेख नोंद यावी – आ. आशुतोष काळे

वृत्तवेध ऑनलाईन | 13 Oct 2020,
By: Rajendara Salkar 10.30

कोपरगाव : वर्षानुवर्षाच्या भाऊबंदकीला कायमचा आळा बसावा व पोट हिश्श्याचे वाद निकाली निघावे यासाठी जमिनीच्या उताऱ्यावर पोट हिश्श्याचा स्वतंत्र उल्लेख होऊन त्याची नोंद उताऱ्यावर लावण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे. त्याची तातडीने कारवाई सुरू करा असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी महसूल, दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक व भूमीलेख विभागाला दिले आहेत.

मतदार संघातील दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक, भूमीअभिलेख विभाग व महसूल विभागाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निकष पाळून कोपरगाव तहसील कार्यालय येथे सोमवारी ( १२) रोजी जनता दरबार घेतला.

आ.काळे म्हणाले, मागील सात महिन्यापासून देशात व राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे १० मार्च रोजी दूसरा जनता दरबार झाल्यानंतर लॉकडाऊन असल्यामुळे जनता दरबार घेता आला नाही. मागील दोन जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांचे रखडलेले प्रश्न मार्गी लागले आहेत. जून महिन्यापासून अनलॉक सुरु झाले व घातलेली बंधनं शिथिल करण्यात आली. त्यामुळे उर्वरित प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी जनता दरबार घेतला. कोरोनाच्या नावाखाली अनेक सरकारी कार्यालये बंद होती तर अनेक सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी होती व काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा देखील झाली होती. मात्र हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. त्यामुळे मुद्दामहून जनता दरबार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. या जनता दरबारात घरकुल खरेदीसाठी गुंठेवारी खरेदी सुरु असल्याबाबत तसेच भूमीअभिलेख कार्यालयाचे प्रलंबित प्रश्नांचा आमदारांनी आढावा घेतला. यावेळी अनेक नागरिकांनी आपले प्रश्न मांडले
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक पद्माकांत कुदळे, सुनील शिंदे, सचिन रोहमारे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, राहुल रोहमारे, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, श्रावण आसने, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

.

Leave a Reply

You cannot copy content of this page