चेक वटला नाही, आरोपीस शिक्षा व भरपाईचा आदेश 

चेक वटला नाही, आरोपीस शिक्षा व भरपाईचा आदेश

वृत्तवेध ऑनलाईन | 13 Oct 2020,
By: Rajendara Salkar 15.30

कोपरगाव :सव्वा लाख रुपयांचा चेक न वटल्याप्रकरणी कोपरगाव न्यायालयाने जामीनदारास तीन महिन्यांची साधी कैद व तक्रारदारास १ लाख ३५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली आहे.

अविनाश पोपट कांबळे असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अविनाश कांबळे हे डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था यांच्याकडून कर्ज घेतलेले राजू सुखदेव सोनवणे यांना जामीनदार होते. जामीनदार या नात्याने सोनवणे यांच्याकडील थकीत कर्जापोटी अविनाश कांबळे यांनी पतसंस्थेत १ लाख २६ हजार ४९० रुपयांचा धनादेश दिला होता. परंतु सदरचा धनादेश न वाटल्यामुळे पतसंस्थेने कांबळे यांच्या विरोधात कोपरगाव न्यायालयात फौजदारी केस दाखल केली होती. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.एम. पांचाल यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. कांबळे यांच्याविरुद्धचा आरोप सिद्ध झाल्याने तीन महिना साधी कैद व तक्रारदारास १ लाख ३५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली. पैसे देण्यात कसूर केल्यास आणखी १५ दिवसाची कैद सुनावली आहे. तक्रारदारातर्फे अँड बी.एम. सोनवणे यांनी काम केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page