शिर्डी कोविड वॉरीयर्स सौ. चव्हाण व सौ. जाधव यांचा चांदेकसारेत सन्मान
वृत्तवेध ऑनलाईन | 19 Oct 2020,
By: Rajendara Salkar 18.20
कोपरगाव : देशासह महाराष्ट्रात कोरोनाचे संकट गंभीर आहे जो तो आपली काळजी घेतो. मात्र कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची काळजी घेणारे डॉक्टर ,आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका, परिचारिका यांचे काम देवदुतासारखे आहे. अशाच चांदेकसारे येथील कर्तव्यदक्ष कोरोना रूग्ण सेवा करून आलेल्या सौ. मोनिका सतीश चव्हाण व मीनाक्षी जाधव यांचा सन्मान चांदेकसारे श्री भैरवनाथ जोगेश्वरी युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी शंकरराव चव्हाण, मधुकर होन, किरण होन, सागर होन, नितीन होन, दादासाहेब होन, सचिन होन, प्रवीण होन,सतिष चव्हाण,रविंद्र होन, सुधाकर होन अदी उपस्थित होते.श्री साईबाबा संस्थान,शिर्डी येथे covid care मध्ये corona बाधित रुग्णांची सेवा करून ,आपले कर्तव्य बजावून , quarantine चा ७ दिवसांचा काळ संपवून आपल्या घरी आल्या, त्यांच्या याच कार्याचा गौरव प्रतिष्ठान’ने करत त्यांचा सन्मान केला.