विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोनचा उपयोग हा केवळ अभ्यासासाठीच करावा. – सौ. चैताली काळे

विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोनचा उपयोग हा केवळ अभ्यासासाठीच करावा. – सौ. चैताली काळे

वृत्तवेध ऑनलाईन | 22 Oct 2020,
By: Rajendara Salkar 16.20

कोपरगाव : कोरोनामुळे शाळा महाविद्यालय बंदच आहेत. शाळा, महाविद्यालयाचे शिक्षक व प्राध्यापक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तास घेत आहेत.मात्र अनेक हुशार विद्यार्थ्यांना पालक स्मार्ट फोन घेवू शकत नाहीत. आज दिलेल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सध्या येत असलेली अडचण दूर होणार असली तरी स्मार्ट फोनचा उपयोग हा केवळ अभ्यासासाठी करावा. असे आवाहन
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैताली काळे यांनी केले.मात्र शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी नियमितपण शाळेत हजर राहून चांगला अभ्यास करून उत्तीर्ण व्हावे असेही त्या म्हणाल्या,

सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाण व आमदार आशुतोषदादा काळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुप्रसिद्ध लेखक व कवी प्रवीण दवणे यांच्या जगण्याची कला या कार्यक्रमाच्या जमा निधीतून १० वीच्या निवडक गरजू विद्यार्थ्यांना सौ. चैताली काळे यांच्या हस्ते स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या.

चैताली काळे म्हणाल्या, समाजातील दिन, दलित, शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील गरजू मुलांच्या शिक्षण तसेच त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक उपक्रमांना माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे माजी आमदार अशोक काळे यांनी नेहमीच पाठबळ दिले असून काळे परिवाराचा हा वारसा आमदार आशुतोष काळे पुढे चालवित आहे. सामाजिक उपक्रमांच्या पाठीशी आमदार आशुतोषदादा काळे फाउंडेशन खंबीरपणे उभा राहील.

यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, ठोळे उद्योगसमूहाचे कैलास ठोळे, ॲड. स्मिता जोशी, ज्ञानेश्वर वाकचौरे, सावित्रीबाई फुले ज्ञानदीपच्या अध्यक्षा सौ. संगिता मालकर, सौ. वृंदा कोऱ्हाळकर, सौ. वर्षा आगरकर, सौ. सुनीता वाकचौरे, सौ. सुनीता ससाणे, सौ. छाया गिरमे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page