आत्मा मालिकची नीट परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी
६६३ गुण मिळवून आदित्य उंबरकर कॉलेजमध्ये प्रथम स्थानी
वृत्तवेध ऑनलाईन | 22 Oct 2020,
By: Rajendara Salkar 16.30
कोपरगांव : वैद्यकिय क्षेत्रातील पदवीच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या पीट परिक्षेत आत्मा मालिक ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. ७२० गुणांच्या या परीक्षेत आदित्य उंबरकर याने ६६३ गुण मिळवून हे यश संपादन केले.
त्याचप्रमाणे विनिता काकडे ५८७ गुण, संकेत गायकवाड ५८५ गुण, ऋतुजा मोरे ५७४ गुण, आर्यन सोनवणे ५७१ गुण, प्रथम लोढा ५६९, प्रसाद शिंदे ५६३ गुण, प्रज्ञा कोळसे ५४१ गुण, ऋषिकेश झरेकर ५३३ गुण, पार्थराज अन्नदाते५२७ गुण, आकांक्षा शिंदे ५०५ गुण, सेजल लोंढे ५०६ गुण, तर वाबळे आश्विन यांने ५०० गुण मिळविले. तसेच ४०० ते ५०० गुणांदरम्यान १४ विद्यार्थी तर ३०० ते ४०० गुणांदरम्यान १९ विद्यार्थ्यांनी गुण मिळवून यशस्वी झाले.
सदर निकालाविषयी प्रतिक्रिया देताना आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हटले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असुनही योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते स्पर्धेतून बाहेर फेकले जातात. ग्रामीण भागामध्ये पुणे, मुंबई, कोटा, दिल्ली अशा शहरातील कोचिंग क्लास प्रमाणे सुविधा उपलब्ध करून देवून विद्यार्थ्याचा व पालकांचा आर्थिक भार कमी करून शहरांच्या तोडीचे शिक्षण देण्याची सुविधा आत्मा मालिकने उपलब्ध करून दिली आहे. नीट व जेईई या परीक्षांच्या तयारीसाठी आकाश कोचिंग इन्स्टिटयूट आयआयटी, नाटा, सीईटी या परीक्षांच्या तयारीसाठी प्लॅनेट इन्स्टिटयूट तसेच एन.डी.ए. व एस.ए.टी परीक्षेच्या तयारीसाठी ए.एम.एन.डीए. कोचिंग इन्स्टिटयूट अशा इन्स्टिटयूटचे मार्गदर्शन विद्यार्थ्याना उपलब्ध करून दिलेले आहे.
याबरोबरच कॉलेज, मेस, निवास, ग्रंथालय इ. दर्जेदार सुविधा असणारे आत्मा मालिक हे महाराष्ट्रीतील एकमेव कॉलेज आहे. त्याचीच फलश्रूती म्हणजे हा निकाल आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.