नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांचा रस्ता खचला
वृत्तवेध ऑनलाईन | 24 Oct 2020,
By: Rajendara Salkar 19.20
कोपरगाव : नगर-मनमाड महामार्गाचे काम गेल्या काही वर्षापासून झालेले नाही त्यामुळे मोठ मोठाल्या खड्ड्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून सातत्याने होणाऱ्या पावसामुळे महामार्ग खचला आहे.
नगर-मनमाड महामार्गावरील कोपरगाव शहरानजीक टाकळी नाका ते पुणतांबा फाटा यादरम्यानचा रस्ता पावसानंतर खचला आहे. मोठ मोठाले खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना गाडी चालविताना सर्कस करावी लागते विशेष म्हणजे यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सार्वजनिक बांधकाम खाते याकडे गांभीर्याने पहात नाही याबाबत नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.