नगराध्यक्षांना विधानसभेला तेराशे मते ही जनतेने त्यांना दिलेली त्यांच्या अपयशाची पावती   – विवेक कोल्हे 

नगराध्यक्षांना विधानसभेला तेराशे मते ही जनतेने त्यांना दिलेली त्यांच्या अपयशाची पावती   – विवेक कोल्हे 

वृत्तवेध ऑनलाईन | 26 Oct 2020,
By: Rajendara Salkar 18.20

कोपरगाव : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोपरगाव शहरात १७ ते १८ हजार मते मिळवून राज्यात  उच्चांकी विजयाचा झेंडा गाडणाऱ्या  नगराध्यक्षांवर पालिकेच्या तीन वर्षाच्या कारकीर्दीनंतर विधानसभेला अवघी तेराशे मते पडण्याची नामुष्की येते, तेंव्हा ती जनतेने त्यांना  दिलेल्या त्यांच्या अपयशाची पावतीच म्हणावी लागेल अशी टीका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी सोमवारी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे  यांच्या पदग्रहण समारंभात केली. खरेतर यानंतर नैतिक जबाबदारी समजून नगराध्यक्ष यांनी राजीनामा देण्याची गरज होती असा टोलाही त्यांनी लगावला.

नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांना खुर्चीवर बसवितांना युवा नेते विवेक कोल्हे
जनतेतून नगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर सरकारने शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी   दरमहा  सर्वसाधारण सभा घेण्याचा कायदा केला आहे ही सभा घेण्याचा सर्व अधिकार व जबाबदारी नगराध्यक्ष  यांची असते  मात्र ती त्यांनी पार पाडली नाही. २०१६ मध्ये पालिकेची निवडणुक झाली गेल्या चार वर्षांमध्ये दरमहा एक  
याप्रमाणे ४८ सभा होणे अपेक्षित होते. यात कोरोना काळ वजा करता किमान ३५ ते ४० सभा होणे अपेक्षित सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित होते. परंतु पालिकेत  १५ एप्रिल २०१७ व १५ सप्टेंबर २०२० रोजी शेवटची सभा झाली. दोन महिन्याला एक याप्रमाणे निवडणुक झाल्यापासुन आज अखेर २७ सभा होणे गरजेचे असतांना आज अखेर एकुण १३ सर्वसाधारण सभा झाल्या आहेत.  यावरून  नगराध्यक्षांना जनतेच्या  समस्या व अडीअडचणीची किती तत्पर्ता आहे हे स्पष्ट होते.
विवेक कोल्हे बोलतांना म्हणाले की, विकास काम करायचे असेल तर केंद्रात, राज्यात, तालुक्यात आपली सत्ता होती म्हणुन पालिकेत देखील आपण एकमताने काम केले पाहिजे म्हणुन आम्ही आमची तयारी दाखविली. जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असलेले विषय सभेत घेण्यासाठी वारंवार मागणी करुन देखील नगराध्यक्षांनी नगरसेवकांच्या मागणीला केराची टेापली दाखविली जे विषय घेणे गरजेचे असतांना देखील ते मिटींग अजेंडावर नगरध्यक्षांनी न घेता मलीदा कशा माध्यमातुन मिळेल अशा विषयास प्रथम प्राधान्य दिले आहे.  
यु.आय.डी.एस.एस.एम.टी या योजने अंतर्गत कोपरगांव शहराकरीता ४९.५ कोटी रुपयांची योजना केंद्र व राज्य शासनाने मंजुर केलेली असताना सदरची योजना आज अखेर पूर्ण क्षमतेने प्रत्यक्षात कार्यान्वीत नाही. आज अखेर सदर योजना कार्यान्वीत का झाली नाही ? याचा खुलासा नगरपालिकेने जनतेस करावा असे आवाहन विवेक  कोल्हे यांनी शेवटी केले.   
यावेळी   अमृत संजीवनी पराग संधान ,  कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे , शरदनाना थोरात उपजिल्हाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे , दिलीप दारुणकर  , विनोद राक्षे उत्तर जिल्हाध्यक्ष नगर अनुसुचित जाती मोर्चा, शहराध्यक्ष दत्ता काले , अरुणदादा येवले , तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम , माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल , विजय वाजे  , कैलास खैरे माजी शहराध्यक्ष, बाळासाहेब नरोडे, ज्ञानेश्वर परजने, ,  बबलू वाणी,अशोक लकारे, सत्यजित मुंदडा , शिवाजी खांडेकर , दिनेश कांबळे वैभव गिरमे, दीपक जपे,अकबरलाला शेख , निसर भाई शेख , शरद त्रिभुवन, रोहित वाघ अशोक टुपके, विष्णुपंत गायकवाड, सोमनाथ मस्के , सोमनाथ अहिरे , मुन्ना दरपेल, नरेंद्रल लकारे ,सागर कोपरे, प्राध्यापक लासंकर सर , मुकुंदमामा काळे , रवींद्र रोहमारे , सिद्धार्थ साठे , रामदास गायकवाड सर ,रोहित कनगरे, वासुदेव शिंदे ,सिद्धार्थ पाटणकर , सागर राऊत ,बाळासाहेब दीक्षित, निलेश बोराडे ,महेंद्र नाईकवाडे, खालिद कुरेशी , पिंकी चोपडा, अर्जुन मोरे , शंकर बिराडे , सचिन जाधव , शिवाजीराव निखाडे सर , शुभम काळे , माउली गोसावी विविध संस्थेचे संचालक, आजी माजी नगरसेवक, युवक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page