भारताचा तिरंगा फडकविणार नाही” हे विधान करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती ला देशद्रोही घोषीत करा- प्रा.सुभाष शिंदे
वृत्तवेध ऑनलाईन।28Oct2020
By:Rajendra Salkar, 17:00
कोपरगाव: जम्मु काश्मीर च्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी च्या वादग्रस्त नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी नुकतेच “जोपर्यंत जम्मु काश्मीर मध्ये ३७० वे कलम रद्द होत नाही. तोपर्यंत भारताचा तिरंगा ध्वज फडकविणार नाही” अशा प्रकारचे राष्ट्रविरोधी विधान करून या देशाचा व या देशातील घटनेचा अपमान केलेला आहे,अशा राष्ट्रद्रोही विधान करणाऱ्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा जेणे करून देशाच्या विरोधात कोणताही पक्ष-संघटना- व्यक्ती अशा प्रकारचे विधान करण्याचे धाडस करणार नाही .अशा प्रकारचे निवेदन कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टी वसंत स्मृतीच्या वतीने देशाचे राष्ट्पती मा.रामनाथजी कोविंद यांना कोपरगाव चे तहसीलदार मा. योगेश चंद्रे यांच्यामार्फत देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, प्रा.सुभाष शिंदे,विनायक गायकवाड, चेतन खुबाणी, संजय कांबळे,किरण थोरात,विनीत वाडेकर,योगेश वाणी, प्रमोद पाटील सर आदि अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.
प्रा.सुभाष शिंदे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झालीत तरी देखील भारतात काही राष्ट्रविरोधी शक्ती या अजून देखील कार्यरत आहेत अशा शक्तीचा मुळापासून बिमोड केला पाहिजे जेनेकरून भारत मातेचे लचके तोडणाऱ्या अंतर्गत व बाह्य शक्तींना चपराक बसेल.भारतीय सेना व भारतीय पोलीस दल हे करण्यास सक्षम आहे. परंतु भारत हा शांतता प्रिय देश म्हणून ओळखला जातो त्यामुळे अशा राष्ट्रद्रोही व्यक्ती त्याचा गैरफायदा घेतात. परंतु केंद्रसरकारने आता या देशद्रोही शक्ती विरोधात लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत. व आपण सर्व राजकिय पक्षांनी देखील अशा राष्ट्रीय मुद्यावर एकत्र आले पाहिजे.
शेवटी अशा घटनेचा निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले.