कोपरगांव नगरपरिषद पथविक्रेता पीएम स्वनिधी योजनेची अंमलबजावणी प्रगतीवर” – प्रशांत सरोदे

कोपरगांव नगरपरिषद पथविक्रेता पीएम स्वनिधी योजनेची अंमलबजावणी प्रगतीवर” – प्रशांत सरोदे

वृत्तवेध ऑनलाईन।28Oct2020
By:Rajendra Salkar, 18:00

कोपरगाव : केंद्र व राज्य शासन, नगर विकास विभाग यांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कोपरगाव नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग आणि कोपरगाव नगरपरिषदेचा मार्केट विभाग यांच्या मार्फत शहरातील पथविक्रेत्यांचे कायम, हंगामी, व तात्पुरते या गटात दिनांक १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दरम्यान बायोमॅट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. सदरील सर्वेक्षणामध्ये एकूण १०४६ पथविक्रेत्यांची नोंदणी झाली आहे. अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली.

महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग- शासन निर्णय क्र.पीएमस्वनिधी -२०२०-/प्र.क्र.७७/ नवि-२०. दिनांक :- १७ जून २०२०.यानुसार उध्दभवलेल्या कोविडच्या परिस्थितीमुळे पथविक्रेते यांचे उद्योग व्यवसाय बंद झाल्या सारखेच आहे. त्यामुळे पथविक्रेते यांना आपला व्यवसाय  सुरळीत ठेवण्यासाठी भांडवलाचा पतपुरवठा बँका मार्फत प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. शहरी फेरीवाला / पथविक्रेता  यांना सूक्ष्म-पतपुरवठा करण्यासाठी मार्गदर्शक सुचने प्रमाणे पात्र लाभार्थींना बँकेमार्फत प्रती लाभार्थी रुपये १००००/- इतके  कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर प्रमाणे वितरीत झालेल्या कर्ज प्रस्तावांना ७% व्याज अनुदान लाभार्थीनी नियमित कर्जाची परत फेड केल्यास दर तिमाही व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तसेच फेरीवाले यांनी डीजीटल पद्धतीने व्यवहार केल्यास त्यांना प्रती महा रु.१००/- पर्यंतचा कॅश ब्याकचा अतिरिक्त लाभ  मिळणार आहे. 
या कामी व योजनेच्या अमलबजावणी नियंत्रणासाठी कोपरगांव शहर पातळीवर शासन निर्णयानुसार मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समिती योजनेच्या अंमलबजावणी करिता दुवा /समन्वय म्हणून महत्वाची भूमिका निभावत आहे. सदर समितीच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पथविक्रेता सर्वेक्षण यादीतील लाभार्थ्यांना ऑलाईन पद्धतीने अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. 
त्यानुसार आज अखेर कोपरगाव शहरातील ५३६ पात्र लाभार्थ्यांनी ऑलाईन पद्धतीने अर्ज सादर केले आहेत. यापैकी ३४२ प्रस्तावांना संबधित बँकेंनी ऑनलाईन पद्धतीने मंजुरी दिली आहे. मंजूर प्रस्तावांपैकी १९२  लाभार्थ्यांना प्रत्यक्षात प्रत्येकी रु.१००००/- प्रमाणे कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये पंजाब नँशनल बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांनी सर्वाधिक प्रस्ताव निकाली काढले आहेत. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, आय डी बी आय बँक आणि सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया या सर्व बँकांनी या योजनेच्या अंमलबजावणी साठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. 
परंतु सदर योजनेच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याच्या आधारकार्ड सोबत त्याचा मोबाईल नंबर जोडलेला असणे आवश्यक आहे. तसेच आधारकार्ड बरेच दिवसा पासून वापरात नसल्याने लाभार्थ्यांना अर्ज करण्यास अडचणी येतात. पात्र लाभार्थी यांनी आपले आधारकार्ड वापर अद्यावत करावे व पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा असे कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजयराव वहाडणे आणि उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी अवाहन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page