मायक्रो फायनान्स कंपनी कडून महिला बचत गटाची  वसुली थांबवावी – सौ स्नेहलता कोल्हे 

मायक्रो फायनान्स कंपनी कडून महिला बचत गटाची  वसुली थांबवावी – सौ स्नेहलता कोल्हे

 मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे, अर्थमंत्री ना अजित पवार यांचेकडे मागणी

वृत्तवेध ऑनलाईन।29ct2020
By:Rajendra Salkar, 16:00

कोपरगाव : सध्याच्या कोरोना महामारीमुळे आर्थीक घडी विस्कटलेली असतांना मायक्रोफायनान्स कंपन्यांनी महिला बचत गटाला  जास्तीच्या व्याज दराने दिलेल्या कर्जाची वसुली सक्तीने सुरू केली आहे. त्यामुळे महिलांना मोठया आर्थीक कसरतीचा सामना करावा लागत आहे, महिला बचत गटांकडून होणारी कर्जाची वसुली त्वरीत थांबविण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्यांचे मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे व  उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना अजित पवार यांचेकडे केली आहे.

मायक्रोफायनान्स कंपन्यांनी ग्रामीण भागातील अशीक्षित महिलांना त्यांच्या आर्थीक विवंचनेतचा फायदा घेत जास्तीच्या दराने कर्ज वितरण केले आहे. घरगुती अडचणीच्या काळात अशा कंपन्यांकडून अनेक महिला बचत गटाच्या महिलांनी कर्ज घेतलेले आहे. या महिलांच्या आर्थीक अडचणींचा आणि अशीक्षित पणाचा गैरफायदा घेउन विविध मायक्रोफायनान्स कंपन्यांनी कर्ज वितरीत केले. परंतु सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक व्यवहारही विस्कळीत झाले. या महिलांनाही या परिस्थितीची झळ बसली. त्यांच्या हाताला काम नाही, मोलमजुरी करून पोट भरणा-या महिलांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला असल्याने मायक्रोफायनान्स कंपन्यांची कर्जाची हप्ते भरण्याची सध्याची परिस्थिती नाही. तरीही या कंपन्यांकडून कर्जाच्या वसुलीसाठी सातत्याने तगादा लावला जातो. महिलांकडून सक्तीची वसुली करून त्यांच्या अन्याय होत आहे. महिला भगिनींच्या या समस्यांचे निवारण करणे गरजेचे आहे. त्यामुळे विविध मायक्रोफायनान्स कंपन्याकडून सुरू असलेली कर्ज वसुली त्वरीत थांबविण्यात यावी, अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page