रस्त्याच्या कामापूर्वी कालव्यांच्या चार्‍या करा- भगिरथ होन

रस्त्याच्या कामापूर्वी कालव्यांच्या चार्‍या करा- भगिरथ होन

वृत्तवेध ऑनलाईन।30ct2020
By:Rajendra Salkar, 16:00

कोपरगाव : सावळीविहीर महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या जोरात सुरू असुन झगडे फाटा ते सावळीविहीर दरम्यान असलेल्या पाटबंधारे विभागाच्या चा-या आगोदर कराव्यात अशी मागणी शेतकरी भगिरथ होन यांनी केली आहे .

 

यंदा पाउस भरपूर झालेला असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थीतीत आता शेतक-यांना नव्याने पिके घ्यावी लागणार आहे . सिन्नर ते सावळीविहीर महामार्गाचे काम सुरू झाल्याने पाटबंधारे विभागाच्या चा-या ठिकठिकानांहुन छोट्या उपचाऱ्या मधुन जात आहे.
रोड रूदीकरणात या चा-यांची नासाडी होणार आहे . त्यामुळे धरणांत पाणी असुनही शेतकरी पाटपाण्याच्या हक्कापासुन वंचीत राहाण्याची शक्यता असल्याने शासनाने प्रथम चा-या असतील तेथे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाईल याची व्यवस्था करावी.
सावळीविहीर ते झगडेफाटा पर्यंत अनेक ठिकाणी पाटबंधारे खात्याच्या चा-यामधुन गोदावरी उजव्या कालव्याचे पाणी शेतक-यांना मिळते आहे . रोडच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे रोटेशनमधुन मिळणा-या पाण्यावाचुन शेतकरी वंचीत राहु नये, यासाठी सरकारने तातडीने रोडमधील चा-यांची कामे हाती घेवून येत्या रोटेशनपुर्वी सर्व कामे मार्गी लावावीत अशी मागणी भगिरथ होन यांनी केली आहे .

Leave a Reply

You cannot copy content of this page