सहकार महर्षी शंकरराव कोल्हे हा औषधी उत्पादनात  चायनाला टक्कर  देणारा देशातील पहिला सहकारी कारखाना असेल – बिपीन कोल्हे 

सहकार महर्षी कोल्हे हा औषधी उत्पादनात  चायनाला टक्कर  देणारा देशातील पहिला सहकारी कारखाना असेल – बिपीन कोल्हे 

पाच वर्षात पॅरासिटामोल व त्यावरील उप औषधी उत्पादनासाठी  २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

७ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप, १८टक्के बोनस, ऊसाला शंभर रुपये जादा भाव

वृत्तवेध ऑनलाईन।3Nov2020
By:Rajendra Salkar, 14:30

 कोपरगाव : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने आजवर अनेक चढ-उतार पाहिले आहे, चालू गळीतास ऊस भावात संजीवनी जिल्ह्यात अन्य सहकारी साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत घोषणा प्रमाणे येत्या पाच वर्षात कोल्हे कारखाना पॅरासिटामोल व त्यावरील उप औषधी उत्पादनावर सभासद शेतकरी सर्वांच्या सहकार्यातून २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून चायनाला टक्कर देणारा देशातील  सहकारी तत्वावरील पहिला  कारखाना राहील अशी ग्वाही अध्यक्ष बिपीन  कोल्हे यांनी दिली, दिवाळीनिमित्त मागील गाळप झालेल्या उसासाठी जास्तीचा शंभर रुपये दर, तर कामगारांना १८ टक्के बोनस देण्याचा निर्णय यावेळी जाहीर करून  ७ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करणारा संजीवनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

           सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत बिपीनदादा कोल्हे, कोपरगाव औद्योगीक वसाहतीचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, सौ मंगलताई दवंगे यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
             प्रारंभी प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र सूर्यवंशी, वर्क्स मॅनेजर प्रकाश चांदगुडे, सर्व संचालक, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, खातेप्रमुख उपखातेप्रमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले.   साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी प्रास्ताविक केले.    याप्रसंगी भाजपचे प्रांतिक सदस्य रवींद्र बोरावके, ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संजीवनी उद्योगसमूहाच्या विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी  शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, राज्य कांदा उत्पादक महासंघ कोपरगाव तालुका अध्यक्षपदी वसंतराव देशमुख तर को रो ना वॉरियर्स म्हणून बाळासाहेब पानगव्हाणे, चंद्रभान चिने, प्रवीण पानगव्हाणे,  यांचा विवेक कोल्हे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.  ऊसउत्पादक सभासदांसाठी संजीवनी डायरीचे प्रकाशन यावेळी बिपीन कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
            श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीने अनेक संघर्ष पाहिले.  आज खुल्या अर्थव्यवस्थेत सर्वत्र आव्हाने निर्माण झाली आहे.   कोल्हे कारखाना त्यासाठी सज्ज व्हावा म्हणून आपण गेल्या दहा महिन्यापासून बिपिन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी उत्पादनात आपला कारखाना अग्रेसर कसा राहील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.   कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे  यांनी कधीही कोटीच्या वल्गना केल्या नाही, मात्र सध्याचे लोकप्रतिनिधी आमच्या कामाची टीकाटिपणी करून आम्हीच मंजूर करून आणलेल्या कामाच्या कोनशीला लावून आमच्या कर्तृत्वाची पावती देत आहे, कुठलेही काम न करता स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या कामाचे मार्केटिंग करणारे आमदार तालुक्याला लाभले आहेत अशी मिश्किल टीकाही केली.
             श्री. बिपिन   कोल्हे पुढे म्हणाले की, देशात साखर उद्योग सध्या अडचणीत आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत धाडसाने साखर उद्योग व शेतकरी सभासदांना दिलासा देण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेत साखर विक्रीचा दर ठरवून दिला.   या उद्योगाला चांगल्या स्थितीत आणण्यासाठी इथेनॉल बाबत जसा निर्णय घेतला तसा साखर विक्रीचा जास्तीचा ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर करून द्यावा असे ते म्हणाले.   उसाच्या जादा उपलब्धतेमुळे देशात या हंगामात ३५०  ते ४००  लाख टन साखरेचे उत्पादन होणार असून १६० ते १८० लाख टन साखर शिल्लक राहणार आहे.  साखर दादा शिल्लक राहणार असल्याने त्याचे दर पडून जातील परिणामी त्याचा फटका साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात बसेल आर्थिक असंतुलन वाढेल. शेतकऱ्यांनी जादा साखर उतारा देणाऱ्या ८६०३२ या ऊसजातीची लागवड करावी, यासाठी कारखान्यांने तीन हजार रुपये प्रति एकरी अनुदान दिले आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सर्वप्रथम  अनेक पायलट प्रकल्प देऊन विविध रासायनिक व पदार्थांची निर्मिती केली. बारा मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प अत्यंत कमी खर्चात उभा केला. या हंगामात औषधी उत्पादने निर्मिती साठी दोन कोटी रुपये खर्च केले, तर पुढील वर्षी ८० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.   भविष्यात सहकार महर्षी कोल्हे कारखाना औषधी उत्पादने प्रमुख तर साखर उपपदार्थ निर्मितीत दुय्यम राहणार असल्याचे ते म्हणाले.   सूत्रसंचालन संचालक शिवाजीराव वक्ते यांनी करून आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page