५८ हजाराच्या दागिन्यांसह पाकीट चोरले

५८ हजाराच्या दागिन्यांसह पाकीट चोरले

The gold vessel was stolen

वृत्तवेध ऑनलाईन | 2Nov 2020
By:Rajendra Salkar, 21:16

कोपरगाव : बाजारात असताना एका महिलेने  फिर्यादीच्या बॅगमधून अठ्ठावन्न हजार रुपये किमतीची सोन्याची दिड तोळ्याची दागिने असलेले पाकीट चोरून नेले. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हकीकत अशी की, फिर्यादी
सौ.मोना रविंद्र जेधे (२८), औदयोगीक वसाहत संवत्सर, कोपरगाव. या शनिवारी  (३१) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सराफ बाजार ते कापड बाजार दरम्यान फिर्यादी ही तिचे दोन लहान मुलीसह बाजारात खरेदी करत असताना पिशवीत ठेवलेले पाकीट व त्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची पोत ५८ हजार रुपये किमतीची रोख रक्कम,सेंट्रल बॅकेचे अेटीएम कार्ड,आधार कार्ड,पासपोर्ट साईज फोटो वरील वर्णनाचा व किमतीचा माल अनोळखी महीलेने चोरुन नेला.
याबाबत कोपरगाव शहर पोलिसात सोमवारी (२) रोजी फिर्याद देण्यात आली असून शहर पोलिसांनी अनोळखी महिले विरोधात रजिस्टर नंबर ८०४ /२०२० भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ./१९८६ एस. एच. गायमुखे हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page