३० हजार सभासद नोंदणीचे लक्ष पुर्ण करणार -राजेंद्र झावरे

३० हजार सभासद नोंदणीचे लक्ष पुर्ण करणार -राजेंद्र झावरे

Shiv Sena member registration

४ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर भगवा मास

वृत्तवेध ऑनलाईन | 4Nov, 2020
By: Rajendra Salkar, 11:35 pm

कोपरगाव: कोपरगाव सह उत्तरेतील श्रीरामपूर, नेवासा, प्रत्येक तालुक्यात ३० हजार सभासद नोंदणी लक्ष पुर्ण करणार असल्याची ग्वाही शिवसेना नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिली. मला प्रत्येक तालुक्यात तीस हजार सभासद नोंदणी करून दाखवा, तुम्ही म्हणालं त्या उमेदवाराला उमेदवारी देईल असा शब्द पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ४ नोव्हेम्बर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘भगवा मास ’ आयोजित करण्यात येणार आहे. ‘गाव तेथे शाखा प्रमुख आणि घर तिथे शिवसैनिक’ ही संकल्पना घेऊन शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे लक्ष ठेऊन आगामी निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. कोपरगाव मतदारसंघाची मोर्चेबांधणी या ‘भगवा मास’ करण्यात येणार आहे.

नगर ऊत्तरेतही भगवा मासनिमित्त ५६ दिवसांच्या कालावधीत विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातील सर्व शिवसेनेचे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला पदाधिकारी, संघटक, उपसंघटक, सर्व कामगार सेल, गटप्रमुख, युवासेनेचे सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिक यांचा शिवसेना सभासद नोंदणी कोपरगाव येथे नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी ४ नोव्हेंम्बर रोजी सकाळी ११ वाजता सुरू करण्यात आली आहे .

यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, शहरप्रमुख कलविंदर दडियाल, विधानसभा संघटक असलम शेख, एस. टी. कामगार सेना किरण बिडवे, युवा सेना सुनील तिवारी, भरत मोरे, प्रफुल्ल शिंगाडे, किरण खर्डे, इरफान शेख, नगरसेवक अतुल काले, नगरसेविका वर्षा शिंगाडे सरपंच संजय गुरसळ, योगेश मोरे, सागर जाधव, विक्रांत झावरे, विकास शर्मा, आदिसह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page