झगडे फाटा पोलीस चौकी बनली भूत खाना तिला नाही कोणी वाली

झगडे फाटा पोलीस चौकी बनली भूत खाना तिला नाही कोणी वाली

वृत्तवेध ऑनलाइन,! 4Nov2020 By:Rajendra Salkar, 17:00

कोपरगाव  :   नगर आणि नाशिक या दोन जिल्ह्याच्या हद्दीत आणि कोपरगाव शिर्डी पोलीस ठाण्याच्या कचाट्यात असलेल्या नाशिक-शिर्डी महामार्गावरील झगडे फाटा पोलीस चौकी साईभक्तांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आली, ती आज गेल्या सोळा सतरा वर्षे बंद अवस्थेत भूत खाना सारखी बनली आहे पण त्याला कुणीही वाली नाही.   त्यामुळे बेभरवशाच् काम सध्या येथे सुरू आहे, याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष घालावे आणि ही पोलीस चौकी पूर्ववत सुरू करावी अशी मागणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ संचालक अरुण येवले यांनी केली आहे.

ते म्हणाले की, माजी मंत्री ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे  आमदार असताना सदर पोलीस  करण्याबाबत  सतत पाठपुरावा करून  ही उभारण्यात आली होती नुकतेच जिल्ह्याचे पोलीस प्रमुख  शिर्डी कोपरगाव दौऱ्यावर आले असता, संजीवनी उदोग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस चौकीचे गाऱ्हाणे आम्ही मांडले. नाशिक शिर्डी महामार्ग सध्या मोठ्या रहदारीचा झालेला आहे. त्यातच नव्याने समृद्धी महामार्ग व एन एच  १६० महामार्ग तयार करण्याचे काम जोरात युद्धपातळीवर सुरूआहे.   साई भक्त दर्शनासाठी दर मजल करत पायी शिर्डीत येतात तर काही साईभक्त आपल्या वाहनांने  येतात तसेच या मार्गावर अन्य वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात ये जा सुरू असते.   मात्र झगडे फाटा व परिसरात वाटमारी करून त्यांना अनेक वेळा लुटले गेले आहे, तर काही साईभक्तांना पैसे सोने-नाणे हव्यासापायी मारहाणीच्या घटना देखील सामोरे जावे लागले आहे.   सदर पोलीस स्टेशन बंद असल्याने व आजूबाजूस वेड्या बाबळीच्या काट्याने त्याला वेढले गेल्याने   त्याचा गैर कामासाठी  उपयोग  काही जण करीत असल्याचे  कानावर आले आहे कोपरगाव आणि शिर्डी या दोन पोलीस ठाण्याच्या वादात पोलीस यंत्रणाही झगडे फाटा पोलीस चौकी शिर्डी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असल्याने तेथील पोलीस कामाचा ताण हलका झाल्यावरच या ठिकाणी राउंडला  येतात.

           शिर्डी अंतर्गत कामाचा भार त्यांच्यावर जास्त आहे.   कोपरगाव हद्दीत झगडे फाटा येत असला तरी कोपरगाव पोलीस त्यांचे कार्यक्षेत्र येत नसल्याने या कडे पाहत नाही .  साईभक्तांच्या सुरक्षेसाठी तातडीने लक्ष देऊन व या भागातील चोरटे यांच्यावर धाक बसेल असे काम झगडे फाटा पोलीस चौकी च्या माध्यमातून व्हावे व साईभक्त सह नागरिक प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे वही पोलीस चौकी  सुरू करावी  अशी मागणी  संचालक अरुण येवले यांनी केली आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page