काकडीला शेती अभियानाअंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वाटप कार्यक्रम

काकडीला शेती अभियानाअंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वाटप कार्यक्रम

Agricultural Health Magazine

माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर, बीज प्रक्रिया व जमीन आरोग्य

वृत्तवेध ऑनलाईन | 5 Nov 2020,

By : Rajendrasalkar,16:30

कोपरगाव : तालुक्यातील काकडी येथे गुरुवारी (५) रोजी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वाटप कार्यक्रम, माती परीक्षण प्रशिक्षण कार्यक्रम व बीज प्रक्रियेचे महत्व याबाबत तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

या कार्यक्रमांमध्ये श्री आढाव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य कसे राखावे व पिकानुसार कोणती खते वापरावी जिवाणू व सेंद्रिय खतांचा वापर कसा करावा बीज प्रक्रियेचे फायदे कसे होतात. याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी अथर्व ऍग्रो ऑरगॅनिक नाशिकचे मॅनेजर प्रशांत आढाव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अथर्व बीज प्रक्रिया किटचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच रियल ॲग्रो सर्व्हिसेस सावळीविहीर चे संचालक श्री. राहुल होन यांच्यातर्फे उपस्थित शेतकऱ्यांना मास्कचे वाटप करून अथर्व बीज प्रक्रिया किटचे वितरण करण्यात आले यावेळी माधुरी गावडे मॅडम मंडळ कृषी अधिकारी पोहेगाव, कृषी पर्यवेक्षक भोसले साहेब, कृषी सहाय्यक दिनकर कोल्हे साहेब, तायडे मॅडम तसेच काकडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page