संजीवनी पाॅलीटेक्निकचा निकाल १०० टक्के; शैक्षणिक गुणवत्तेची गगनभरारी कायम
वृत्तवेध ऑनलाईन | 5 Nov 2020,
By : Rajendrasalkar,17:30
कोपरगांवः महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ (एमएसबीटीई), मुंबईने पदविका अभियांत्रिकी शाखेतील अंतिम सत्रातील विद्यार्थी व त्यातील काहींचे मागील सत्रातील अनुत्तिर्ण विषयांच्या उन्हाळी परीक्षा या कोविड १९ च्या महामारीमुळे आक्टोबर २०२० मध्ये घेतल्या. या परीक्षांचे निकाल मंडळाने जाहिर केले असुन यात संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकचा निकाल मंडळाच्या नियमानुसार अंतिम वर्षाचे पाचवे व सहावे सत्र मिळुन १०० टक्के लागला आहे. संजीवनी पाॅलीटेक्निकने शैक्षणिक गुणवत्तेची गगनभरारी कायम ठेवली आहे, अशी माहिती संजीवनी पाॅलीटेक्निकच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की कोविड १९ च्या महामारीमुळे अंतिम सत्रातील एप्रिल/मे २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षा आक्टोबर २० मध्ये घेण्यात आल्या. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यासाठी भरपुर अवधी मिळाला. अंतिम वर्षात काॅम्प्युटर टेक्नालाॅजी विभागात वैष्णवी विवेक महाजन हिने ९७. ०८ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळलिा तर अंजली अविनाश बोरणारे हिने ९६. ६२ टक्के व उर्मिला चांगदेव मातडे हिने ९६. ४५ टक्के गुण मिळवुन अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. तसेच सर्व विभागांमधुनही अनुक्रमे प्रथम, द्वीतिय व तृतिय क्रमांकाच्या माणकरी ठरल्या. याच विभागात वैष्णवी व अंजली आणि निशा अर्जुन सानप यांनी सहाव्या सत्रात १०० पैकी १०० पैकी गुण मिळवुन उच्चांक प्रस्थापित केला. मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात संस्कृती अविनाश गायकवाड हीने ९५. ४४ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांकाची बाजी मारली. तर आकांक्षा मच्छिंद्र कोळपे व श्रेयश संभाजी लोहकणे यांनी अनुक्रमे ९४. २६ व ९२. ५६ टक्के गुण मिळवुन विभागात दुसरा व तिसरा गुणानुक्रम प्रस्थापित केला. अंतिम वर्षात सिव्हिल इंजिनिअरींग विभागात सिध्दी नितीनराव कदम हीने ९६. ३७ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळवीला. ऋषभ संजय संचेती व रविंद्र सुनिल मलिक यांनी अनुक्रमे ९५. ८४ व ९५. ४७ टक्के गुण मिळवुन दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. अंतिम वर्षाच्या इलेक्टिकल इंजिनिअरींग विभागात आरती बाळासाहेब बोळीज हीने शेकडा ९३. ५६ टक्के गुण मिळवुन पहिल्या क्रमांकाची माणकरी ठरली. तर ऋषिकेश विजय परजणे व दर्शन मच्छिंद्र पोटे यांनी अनुक्रमे ९२. ६७ व ९१. ८३ टक्के गुण मिळवुन दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात गौरी संदिप एंडाईत हीने ९४. ७१ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकाविला. अभिजीत राजेंद्र चिने व माधुरी कैलास अहिरे या दोघानीही ९३. ७६ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक मिळविला तर सिध्दार्थ बाळासहेब खालकर याने ९३. ७१ टक्के गुण मिळवुन वर्गात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवीले. इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी विभागाच्या अंतिम वर्षात वाजेद मुनिर शेख याने ९५. ५६ टक्के गुण मिळवुन वर्गात अव्वल क्रमांकाने उत्तिर्ण झाला तर ऋषिकेश गणेश जाधव व शिवानी प्रफुल शाह यांनी अनुक्रमे ९५. १९ व ९४. ८१ टक्के गुण मिळवुन वर्गात दुसरे व तिसरे स्थान पटकाविले.
सहाव्या सत्रातील विषयांच्या तयारीसाठी पुरेसा अवधी मिळाल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून चांगली तयारी करून घेतली. त्यामुळे १८० विद्यार्थ्यांनी काही विषयात १०० पैकी १०० गण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडविले आणि संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर असल्याचे सिध्द केले.
विध्यार्थ्यांच्या या सर्वोत्कृष्ट निकालाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. याच बरोबर प्राचार्य ए. आर. मिरीकर, सर्व विभाग प्रमुख आणि शैक्षणिक संस्थेचा कणा असलेल्या सर्व शिक्षकांचेही अभिनंदन केले.

Post Views:
280