ऊसदराच्या निर्णयाबाबत आमदार आशुतोष काळे यांचा शेतकऱ्यांनी केला सत्कार 

ऊसदराच्या निर्णयाबाबत आमदार आशुतोष काळे यांचा शेतकऱ्यांनी केला सत्कार 

Farmers felicitate MLA Ashutosh Kale regarding sugarcane decision

वृत्तवेध ऑनलाइन । Thu 5 Nov 2020
By:RajendraSalkar, 17:40

 कोपरगाव : सर्वच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जवळपास सुरु झाले असून यावर्षी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ऊसाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला ऊस दराची चिंता पडली होती. मात्र कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी सर्वप्रथम शेतकरी हिताचा निर्णय घेवून ऊस दराच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाने ऊस उत्पादक शेतकरी सुखावला असून शेतकऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर येवून नुकताच त्यांचा सत्कार केला आहे.

                 मागील वर्षी प्रचंड प्रमाणात झालेला परतीच्या पावसाने नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला मोर्चा ऊस शेतीकडे वळविला असल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातच जवळपास साडे पाच लाख टन ऊस यावर्षीच्या गळीतासाठी उपलब्ध असून कार्यक्षेत्राबाहेर देखील उसाचे प्रमाण जास्त आहे. यावर्षी आलेले वैश्विक कोरोना संकट व उपलब्ध असलेला भरमसाठ ऊस त्यामुळे किती दर मिळणार याकडे जिल्ह्यतील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. ज्याप्रमाणे माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी शेतकरी हित जोपासले तोच वारसा पुढे चालविताना गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी चालू वर्षी गळीत हंगामाच्या ऊसाला सरसकट पहिला हफ्ता अडीच हजार रुपये जाहीर करून मागील वर्षी गाळपाला आलेल्या ऊसाला देखील अतिरिक्त शंभर रुपये दर जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला होता. आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा ऊस हे शाश्वत उत्पन्न देणारे नगदी पिक झाले आहे. त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून शेतकऱ्यांनी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधत त्यांचा सत्कार केला.
             यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सुनील शिंदे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, बाबुराव थोरात, किसन पाडेकर, कृष्णराव गाडे, अशोक बैरागी, नंदकिशोर औताडे, दिलीप गोरे, बाळू शेट्टी, राहुल आहेर, राजाराम निबाळकर, चैतन्य कुलकर्णी, सचिन गाडे, दत्तात्रय निकम आदि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
          चौकट:- यावर्षी ऊस पिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ऊसासाठी केलेल्या खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळतो का नाही? याची चिंता होती. एकीकडे कोरोना संकटामुळे सर्वच शेतमालाला दर मिळत नव्हता. कांद्याला कुठतरी दर मिळायला लागला तर केंद्र शासनाने हस्तक्षेप केल्यामुळे पुन्हा कांद्याचे भाव पडले. अशा परिस्थितीत आमदार आशुतोष काळे यांनी जाहीर केलेला ऊस दर व मागील वर्षीच्या ऊसाला दिलेले प्रती टन अतिरिक्त शंभर रुपये त्यामुळे खरोखर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. आम्हाला तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साक्षीने त्यांचा जाहीर सत्कार करायचा होता मात्र कोरोना संकटामुळे आम्हाला आमच्या भावनांना आवर घालावा लागत आहे. – नंदकिशोर औताडे (ऊस उत्पादक शेतकरी)

Leave a Reply

You cannot copy content of this page