घरासमोर लावलेली मोटरसायकल चोरली
The motorcycle was stolen
वृत्तवेध ऑनलाइन।Thu 5Nov2020
By:RajendraSalkar,18:03
कोपरगाव : तालुक्यातील करंजी येथील शेतकऱ्यांच्या घरासमोर लावलेली मोटरसायकल चोरून नेल्याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना बुधवारी रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील करंजी येथील वसंत वामन गोणटे यांनी त्यांच्या मालकीची प्लॅटिना ES कंपनीची मोटरसायकल बुधवारी रात्री १० वाजता घरासमोर लावलेली होती. गुरूवारी सकाळी मोटरसायकल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिस स्थानकात मालकीची ७० हजार रूपये किमतीची मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सफौ. एस.सी. पवार करीत आहेत.
Post Views:
462