अपहरण केलेल्या विशालचा मृतदेह सापडला

अपहरण केलेल्या विशालचा मृतदेह सापडला

The body was found

वृत्तवेध ऑनलाईन | Fri6 Nov 2020, By:RajendraSalkar, 14:14 pm

कोपरगाव  :  बेट येथून मध्ये अपहरण झालेल्या विशाल  रमेश भाकरे याचा मृतदेह अखेर सापडलाय. कोपरगाव गोदावरी नदी पात्रातील  पाण्यात  त्याचा मृतदेह सापडलाय.  त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.

विशाल  हा कोपरगाव येथील भाजीपाला विक्रेत्या महिलेचा मुलगा आहे. तीन चार  दिवसांपासून त्याच्याशी कुटुंबियांचा काहीही संपर्क होत नव्हता. 
राहत्या घरातून मंगळवारी (३) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पंधरा वर्षे पाच महिने वय असलेल्या  विशाल   याचे  अपहरण करण्यात आले होते. अशी तक्रार त्याच्या आईने शहर पोलीस स्टेशनला दिली होती. पोलीस तपास करीत होते. आज शुक्रवारी ६ रोजी अखेर त्याचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात पाण्यात तरंगताना  मिळालाय. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून  पोलीस  निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page