कोपरगाव तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार

कोपरगाव तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार

Leopard mucus

वृत्तवेध ऑनलाइन |Sun8Nov 2020,

By: RajendraSalkar, 41:37 PM

कोपरगाव: तालुक्यात बिबट्यांचा मुक्त संचार वाढत चालला आहे. वाड्यावस्त्यावरील जनावरांचा फडशा पाडुन बिबट्यांची दहशत गोदाकाठच्या परिसरात वाढत चालली आहे.

मुर्शतपुर परिसरातील शेतमळ्यांच्या परिसरात दोन दिवसांपासून मध्यरात्री बिबट्या मुक्त संचार करीत असल्याचे दिसून येत आहे. पाऊलखुणा आढळल्या असून, परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

शनिवारी पहाटे चारच्या सुमारास मुर्शतपूर शिवारातील अनील सुर्यभान दवंगे यांच्या वस्तीवरील चार शेळ्या बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली आहे. कुत्रे, शेळ्या, गाई, आदि पाळिव जनावरांना बिबटे लक्ष करीत असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांवरून दिसत आहे. वन खात्याने या बिबट्यांचा शोध घेवून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मुर्शतपूर परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे. सदर लोक हे बिबट्याच्या हल्ल्याने भयभीत झाले आहे व त्यांना घराबाहेर पडणे, शेतीची कामे करणे कठीण होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page