वृत्तवेध संपादकीय – यंदा ४० कोटीची दिवाळी, तरीही आमची बाजारपेठ ओस का ? राजेंद्र सालकर
Editorial
करूया संकल्प दिवाळीचा ,यंदाची दिवाळी खरेदी फक्त आपल्याच शहरातील बाजारपेठेत !
वृत्तवेधऑनलाईनTue10Nov2020,
By:RajendraSalkar,8:00
कोपरगाव: दिवाळी म्हटल्यावर सेलीब्रेशन (उत्सव) आणि शॉपिंग (खरेदी), रिझोल्यूशन (संकल्प) देखील ओघाने आलेच! यावेळी दिवाळीचा संकल्प,यंदाची दिवाळी खरेदी फक्त आपल्याच म्हणजेच कोपरगाव शहरातील बाजारपेठेत !
सरत्या कोरोनाला निरोप देत दिवाळीचे स्वागत करण्यासाठी सर्वांनी काहीना काही तरी प्लॅन्स केले असतील आणि त्याच्या बरोबरीने या मोठ्या सणाला काय करायचे याचा संकल्पही केला असेल, रिझोल्यूशन हे पूर्ण होतातच असे नाही… पण तरीही ते केले जातातच! आज कोपरगाव शहरातील व्यापारी महासंघाच्या आव्हानाला साद देत करूया संकल्प दिवाळीचा ,यंदाची दिवाळी खरेदी फक्त आपल्याच शहरातील बाजारपेठेत !
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याकडून कामगारांना १८ टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे. तर उत्पादकांनाही साधारण सर्विस शे रुपये मिळणार आहे त्यामुळे अंदाजे १६ ते १७ कोटी रुपये रोख साखर कामगार व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हातात येणार आहे. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांचे पेमेंट, परतीच्या ठेवी, वाहतुकदारांचे पेमेंट आणि कर्मचाऱ्यांसाठीचा बोनस व पगार असे सुमारे १६ कोटी ६३ लाख
असे साधारण ३३ कोटी ६३ लाख रुपये या व्यतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कारखाने, बँका, पतसंस्था, काम करणारे कर्मचारी मजूरवर्ग यांच्या मार्फतही सात ते आठ कोटी रुपये असे सुमारे ४० कोटी रुपये दिवाळीच्या निमित्ताने कोपरगाव करांच्या हातात पडणार आहे.
बोनस हाती पडताच कामगार खरेदीला बाहेर
अवघ्या आठ दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असून कोरोनाच्या गडबडीतून बाहेर पडलेल्या नागरिकांनी बाजारात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी सवलतींची खैरात चालवली आहे. बोनस हाती पडताच कामगार सहज खरेदीला बाहेर पडण्याच्या तयारीत आहे.
कोरोनामुळे अनेकांची दशा झाली तर अनेकांनी आपल्या जीवनाची दिशा बदलली आहे. याचा शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक मनोरंजन आरोग्य मौजमस्ती असा सर्वांगीण परिणाम सर्वांनाच भोगावा लागलेला आहे. कुरणा अजून गेलेला नाही त्याला घाबरून नाही चालणार नाही आता आपल्याला त्याची सवय करावी लागणार आहे मोकळीक मिळत असली तरी हे करताना मात्र सर्व नियमांचे पालन करून आपली कुटुंबाची व इतरांचीही काळजी घ्यावी लागणार आहे. पण यावेळी जरा आपण वेगळे संकल्प करूया,
ज्या गोष्टींचा आपण कधीही विचार केला नाही, त्या गोष्टींचा विचार करण्यास कोरोनाने आपल्याला शिकविले आहे. एकमेकापासून सुरक्षित अंतरावर जरी आपण गेलो असलो तरी एकमेकांची काळजी घेण्याची एकमेकाला मदत करण्याची नवी संकल्पना आपण कोरोना संकटामधून शिकलो आहे. कदाचित समाजातील सध्याची परिस्थीती बघता या सर्वांची गरज निर्माण झाल्याचे वाटते.
सर्वाना भावणारा दीपोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पूर्णपणे सजली असून ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कपडे, आकाशकंदील, फटाके, पणती, रांगोळी, सुगंधी तेल आदींचे स्टॉल मोठय़ा प्रमाणात उभारले आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर
शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोशल मिडियाबरोबर आपण परिवाराला जास्त वेळ दिला आहे.
कोरोना काळात सर्वच वयोगटातील लोक हे सोशल मिडियाच्या जाळ्यात अडकत चालल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे व्यक्तींमधील समोरासमोर होणारा संवाद कमी झाला असून मोबाईल, कम्प्युटरमध्ये लोक अडकून पडले आहेत. संवाद आता केवळ व्हॉट्सअॅप चॅंटींग, फेसबुक चॅटींग, मेल्सपुरता मर्यादीत झाला आहे. अशात घरबसल्या खरेदीचे नवे फॅड तेजीत आले आहे. Amazon, ‘FlipHart, Myntra, Snapdeal, या कंपन्यांकडे मागणी वाढली.विशेष म्हणजे खाण्यापासून सर्वच गोष्टी घरपोच मिळू लागले आहेत. आज करोडो लहानात लहानातील वस्तु पासून मोठ्या लाखो रुपयांच्या वस्तू पर्यंत बिनदिक्कत या कंपन्यांकडून मागवत आहेत. कारण अल्पावधीत या कंपन्यांनी मोठी विश्वासार्हता कमावली आहे. वेळेवर घरपोच सेवा माफक पण योग्य किंमतीत दर्जेदार वस्तू पसंत नसल्यास बदलून देण्याची हमी त्याच बरोबर तत्परता व टाइमिंग या दोन गोष्टींमुळे या कंपन्या आज करोडो लोकांच्या पसंतीस उतरल्या असून दररोज अरबो रुपयांची उलाढाल करीत आहेत.
मोठी खरेदी आणि विविध प्रकारचे गोडधोड आणि आनंद द्विगुणीत करणारा सण म्हणजे दीपावली. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर शहरात मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असते. सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असल्याने खरेदीसाठी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. विविध प्रकारचे तयार कपडे, बालगोपालांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, अत्तर, फटाके, आकाशकंदील, पूजेचे साहित्य, विविध रंगांच्या रांगोळ्या आदी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर गर्दी वाढत आहे.
रेडिमेड फराळाला मागणी
नोव्हेंबरच्या दुस-या आठवडय़ात दिवाळी आल्याने गृहिणींना फराळ तयार करण्यासाठी वेळ कमी मिळत आहे. त्यामुळे यंदा रेडिमेड फराळावर ताव मारणा-यांसाठी गृहउद्योग फराळाच्या तयारीला वेग आला आहे. यंदा दोन लाख किलो फराळ नागरिकांसाठी बनविण्यात येणार असून, जवळपास चार कोटींची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे. पदार्थाच्या किमती गेल्या वर्षीइतक्याच आहेत. शिवाय यंदा रेडिमेड फराळाला मागणी वाढणार आहे.
या उद्योगातून महिलांना उत्तम रोजगार मिळतो. या फराळाच्या निमित्ताने शेकडो महिलांना तीनशे रुपयांची रोजंदारी मिळते आहे. मजुरांच्या कमतरतेने उत्पादकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महिला इतर उद्योगांमध्ये नोक-या करीत असल्याने दिवाळीमध्ये मध्यमवर्गीयांचा फराळ विकत घेण्याकडे मोठय़ा प्रमाणात कल आहे. त्यामुळे बाजारपेठेत असे तयार फराळ विक्रीच्या स्टॉल्सवर महिलांची गर्दी दिसत असून घराघरात तयार फराळाची पाकिटे दिसणार आहेत.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याकडून कामगारांना १८ टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे. तर उत्पादकांनाही साधारण सर्विस शे रुपये मिळणार आहे त्यामुळे अंदाजे १६ ते १७ कोटी रुपये रोख साखर कामगार व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हातात येणार आहे. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांचे पेमेंट, परतीच्या ठेवी, वाहतुकदारांचे पेमेंट आणि कर्मचाऱ्यांसाठीचा बोनस व पगार असे सुमारे १६ कोटी ६३ लाख
असे साधारण ३३ कोटी ६३ लाख रुपये या व्यतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कारखाने, बँका, पतसंस्था, काम करणारे कर्मचारी मजूरवर्ग यांच्या मार्फतही सात ते आठ कोटी रुपये असे सुमारे ४० कोटी रुपये दिवाळीच्या निमित्ताने कोपरगाव करांच्या हातात पडणार आहे. कोपरगावची बाजारपेठ उदवस्त झाली असे कसे म्हणता येईल ? मग असे असतानाही कोपरगावची बाजारपेठ ओस का ? यातील किती पैसा कोपरगावच्या बाजारपेठेमध्ये खरंच जाणार आहे हा खरा संशोधनाचा विषय आहे. यंदाची दिवाळी खरेदी फक्त आपल्याच शहरातील बाजारपेठेतच करा ! असे आवाहन व्यापारी महासंघाला का करावे लागते हा खरा आत्म चिंतनाचा विषय आहे.
मग हा कोट्यावधीचा पैसा जातो कुठे?
सर्वसाधारणपणे कानोसा घेतला असता कोपरगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक येवला, संगमनेर, सिन्नर, नासिक या ठिकाणी किराणा मालापासून ते कपडे खरेदी पर्यंत जात असतात असे आढळून आले आहे. ते असे बाहेरगावी खरेदीसाठी का जातात ? एवढ्या दिवाळी पुरतेच नाही गेल्या आठ-दहा वर्षापासून हिंदीत परिस्थिती आहे किमान दर वर्षी यात वाढ होत आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन चार वर्षांपासून काही खवय्यांचा खाण्यासाठी सुद्धा या शहरांकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला असल्याचे नाकारता येणार नाही. कोरोनामुळे गोष्टींना गेल्यास आठ-नऊ महिन्यात चांगला अटकाव बसला आहे परंतु वातावरण मोकळे होताच परत पहिल्यासारखीच परिस्थिती होणार आहे.आपल्या गावातला पैसा बाहेरच्या गावात खर्चला जातो यावर खरे तर व्यापाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.केवळ मोबाईल वर पाहून किंवा टीव्हीवरील जाहिराती कडे पाहून आज आपल्या शहरातील व ग्रामीण भागातील ग्राहक मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची खरेदी बिनदिक्कत करीत आहे. कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील बाहेर जाणारा हा ग्राहक परत आपल्याकडे वळविण्यासाठी व्यापाऱ्यांना मोठे कसब वापरावे लागणार आहे.
कोरोना काळात येथील व्यापाऱ्यांनी नागरिकांना जरुर मदतीचा हात दिला आहे. त्यांचे ते कार्य नाकारताही येणार नाही परंतु याचा अर्थ तेवढ्याने ग्राहक पुन्हा बाजारपेठेकडे आकर्षित होईल असा नाही दुसरीकडे तुम्ही ज्यांना मदतीचा हात दिला. मुळात उभे केलेले कार्य हेच सामाजिक आहे व त्याला निश्चितच आमचा सलाम आहे. परंतु तुम्ही ज्यांच्याकडून या अपेक्षा करतात
ते मुळात तुमचे ग्राहक आहेत की नाही ? हा एक वेगळाच विषय आहे. जरी असले तरीही हा विषय मुळात व्यावहारिक आहे. त्यामुळे सामाजिक दायित्व व आर्थिक दायित्व याचा वेळ बसू शकत नाही. किंवा केवळ भावनिक आवाहन करून गेल्या काही वर्षापासून दुरावलेला एवढा मोठा ग्राहक मिळवता येणार नाही. हेही तितकेच खरे आहे. त्यासाठी आत्मपरीक्षण करण्याबरोबर आसपासच्या परिसरातील व्यापारातील तफावतीचा अभ्यास करून प्रामाणिकपणे निर्णय घ्यावा लागणार आहे. तरच पुन्हा कोपरगावच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येईल असे आम्हास आजतरी वाटते.