कोपरगावात पावणेचार लाखांची घरफोडी ; दिवाळीत चोरट्यांनी घरच खाली केले.
वृत्तवेध ऑनलाइन।Mon16Nov2020
By:RajendraSalkar,22:00
कोपरगाव : कोपरगाव परिसरातील श्रध्दानगरीत घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. घरातील सर्व सदस्य दिवाळीनिमित्त गावी गेलेले होते. सोमवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरातील रोकड व दागदागीने असा पावणेचार लाखाचा ऐवज चोरला . ही बाब समोर येताच कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दिपक बोरसे हे पुढील तपास करीत आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्रध्दानगरी परिसरातील प्राजक्ता प्लाझाचे पाठीमागे व्यापारी अक्षय कैलास लोहाडे (२६) हे आपल्या कुटुंबिंयांसमवेत राहतात. सोमवारी दुपारी १२ ते १३.४५ वाजेच्या दरम्यान घराच्या दरवाज्याचे लॉक तोडलेले दिसत होते , घराची पाहणी केली. असता घरातील कपडे अस्थव्यस्त पडलेले होते. दागीने दिसून आले नाही. त्यामुळे अज्ञातांनी घरफोडी केल्याचे निश्चित झाले. फिर्यादी अक्षय लोहाडे यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहाडे यांच्या घरातून चोरी गेलेल्या सामानात २,४०,०००/-रुपये रोख रक्कम त्यात १०, ५०, १००, ५००, २००० रुपये दराच्या नोटा, ५०,०००/- रु.किं.अं. दोन तोळ्याची सोन्याची गळ्यातील चैन ७५,०००/-रु.किं.अं.६ सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या खालील दागीन्यांचा समावेश आहे. यासर्व वस्तूंची तक्रारीत नोंद करण्यात आली आहे.





