वैजापूर केंद्राचे समर्थ सेवेकरी भानुदास भिकाजी आलुले पाटील यांचे निधन
स्वामी समर्थ सेवेकरी कडून भावपूर्ण श्रद्धांजली
वृत्तवेधऑनलाइन।Tue17Nov2020, By:RajendraSalkar,12:00
कोपरगाव :वैजापूर येथील श्री.स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख भानुदास भिकाजी आलुले पाटील(६३)यांचे मंगळवारी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ह्दयविकाराच्या झटक्याने दुखःद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
माजी आमदार आर. एम. वाणी यांचे ते अतिशय निकटवर्ती होते. मामा या टोपण नावाने ते प्रसिद्ध होते. परमपूज्य मोरेदादा यांचे मुशीत तयार झालेले भानुदास पाटील हे स्वामी समर्थ सेवेक-यांसाठी मोठा आधार होते. सेवेकऱ्यांना येणाऱ्या अडचणीत योग्य मार्गदर्शन करण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता. मनमिळावू शांत स्वभावाच्या भानुदास पाटलांचा स्वामी समर्थ मार्गातील मोठा व्यासंग व अभ्यास होता. त्यांनी आपल्या गोड वाणीने मोठा मित्रपरिवार व सेवेकरी वर्ग जवळ केला होता. सेवेकऱ्यांना अडीअडचणीत योग्य मार्गदर्शन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी एक मोठी पोकळी समर्थ सेवेक-यांमध्ये निर्माण झाली आहे. अनेकांचा त्यांच्यावर गाढा विश्वास होता. त्यांचा अंतिम विधी वैजापूर अक्षरधाम येथे आज (१७) मंगळवारी दुपारी एक वाजता होणार आहे. स्वामी समर्थ महाराज या स्वामी समर्थ सेवेक-यास चिरशांती देवो! कोपरगाव समर्थ केंद्राच्या भक्त ,सेवेकरी व व्यक्तिशः पत्रकार राजेंद्र सालकर परिवाराच्या वतीने भानुदास पाटलांना भावपूर्ण श्रद्धांजली !