निभांरीगावात एक लाख ८३ हजाराची घरफोडी ;

निभांरीगावात एक लाख ८३ हजाराची घरफोडी ;

वृत्तवेध ऑनलाइन।Fir20Nov2020
By:RajendraSalkar,19:30

कोपरगाव : नेवासा तालुक्यातील निभांरी गावातील शेतकऱ्याची घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. घरातील सर्व सदस्य घरात झोपलेले असतानाही गुरूवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरातील रोकड व दागदागीने असा १ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला . ही बाब समोर येताच नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक व्हि.डी.ठाकूर हे पुढील तपास करीत आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात नेवासा तालुक्यातील निभांरी परिसरातील शेतकरी आनंदराव दौलत जाधव (७०) हे पत्नी दोन मुले दोन सुना व नात आपल्या कुटुंबिंयांसमवेत राहतात. ते झोपलेले असताना गुरूवारी रात्री १० वाजे नंतर ते शुक्रवारी २० रोजी पहाटे दरम्यान घराच्या दरवाज्याचे लॉक तोडलेले दिसत होते , घराची पाहणी केली. असता घरातील कपडे अस्थव्यस्त पडलेले होते. दागीने दिसून आले नाही. त्यामुळे अज्ञातांनी घरफोडी केल्याचे निश्चित झाले. फिर्यादी आनंदराव जाधव यांनी नेवासा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडी नंतर चोरट्यांनी अजून गावातील एक दोन ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
जाधव यांच्या घरातून चोरी गेलेल्या सामानात १,३७,०००/-रुपये रोख रक्कम त्यात १००, ५००, २००० रुपये दराच्या नोटा,४६,५००/- रु.किं.अं. सोन्या-चांदीच्या दागीन्यांचा समावेश आहे. यासर्व वस्तूंची तक्रारीत नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page