दिवाळीनिमित्त ॲड.गुरसळ कुटुंबाकडून महिलांना साड्यांची भेट

दिवाळीनिमित्त ॲड.गुरसळ कुटुंबाकडून महिलांना साड्यांची भेट

वृत्तवेध ऑनलाईन |Fir20Nov 2020, By:RajendraSalkar,18:17

कोपरगाव : सातत्याने सामाजिक जाणिवेचे भान ठेवून मदतीचा हात देणारे कोपरगाव वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड.गौरव गुरसळ यांनी दिवाळीचे औचित्य साधून परिसरातील महिलांना आपल्या गुरसळ परिवाराच्या वतीने साड्यां व मिठाईची भेट दिली.

सातत्याने समाजातील दुर्लक्षित घटकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करून सामाजिक दायित्व समजून मदतीचा हात देणारे अॅड. गौरव गुरसळ यांनी आपल्या परीवारासमवेत मंडपी येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कुटूंबाला भेट देऊन व दिपावली निमित्त बहिणीला व महिलानां साड्या वाटप करण्यात केल्या,
यावेळी अॅड. गौरव गुरसळ म्हणाले, एकीकडे कोरोनाचे संकट व दुसरीकडे अवकाळी पावसामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आली आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक परिवारात यंदाची दिवाळी साजरी केली जात नाही याची सल मनात कुठेतरी होती अशा परिस्थितीत मंडपी परिसरातील बहिणींना साड्यांचे वाटप केले. व त्यांच्या परिवारातील सदस्यांना मिठाई मुलांना चॉकलेटचे वाटप केले त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान व कृतज्ञतेचे भाव पाहून मन गलबलून गेले, खऱ्या अर्थाने आज आपण दिवाळी साजरी केल्याचा मनस्वी आनंद व समाधान मिळाले असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

दिवाळीनिमित्त मंडपी मुर्शतपूर मंडपी परिसरातील महिलांना साड्या व कुटुंबियांना मिठाईचे वाटप अॅड. गौरव गुरसळ,सौ. सारिका गुरसळ, अजिंक्य गुरसळ मुलगा अनिरुद्ध गुरसळ व भाऊ दादासाहेब गुरसळ कुटुंबीयांनी केले यावेळी गावातील नागरिक व महिलाही उपस्थित होत्या.
गुरसळ कुटुंबियांचे गावाबद्दल असलेली तळमळ व प्रेम व त्यांनी केलेल्या
या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांनी केलेल्या मदतीबद्दल ग्रामस्थांनी गुरसळ कुटुंबीयांचे आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page