कु. श्रृती पोटे राज्य स्तरावर विज्ञान विषयात १८ वी; एक्सलनस् मेडल अवॉर्ड मिळणार
वृत्तवेध ऑनलाइन।Sat21Nov2020
By:RajendraSalkar,17:10
कोपरगाव : नेवासा फाटा येथे सेंट मेरिजं स्कूल विद्यालयात ई.६ वी. मधील विद्यार्थिनी कु. श्रृती संजय पोटे हीने राज्य स्तरावर विज्ञान विषयात १८ वा क्रमांक मिळवला .
फेब्रुवारी महिन्यामध्ये इंडियन टॅलेंट ओलेंप्याड या संस्थेने राष्ट्रीय , आंतररा्ट्रीय पातळीवर जवळजवळ नऊ विविध विषयात स्पर्धा परीक्षा घेतली या परीक्षेत सेंट मेरिज विद्यालयातील ३०० विद्यार्थीनीनीं विवीध स्पर्धेत भाग घेतला होता.या विद्यार्थीनीं पैकी ई ६ वी.च्या वर्गातील कु.श्रृती संजय पोटे हीने उज्ज्वल यश संपादन केले . विज्ञान या विषयामध्ये हीने सहभाग घेतला होता या परीक्षेत तिने राज्यात १८ वा. येण्याचा मान मिळवला इंडियन टॅलेंट ओलेंप्याड. तर्फे तिला एक्सलनस् मेडल अवॉर्ड देण्यात येणार आहे .तिच्या ह्या यशाबद्दल नेवासा परिसरात तिचे कौतुक होत आहे .
वडील श्री संजय पोटे ,आई अर्चना पोटे ,भाऊ सर्वेश पोटे. यांनी विशेष अभिनंदन केले.