कोरोनाची भिती आणि ढगाळ वातावरणामुळे कांद्याची आवक वाढली!

कोरोनाची भिती आणि ढगाळ वातावरणामुळे कांद्याची आवक वाढली!

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती Agricultural Market Committee

वृत्तवेध ऑनलाईन |Tue 24 Nov 2020,
By: Rajendra Salkar, 18:00

कोपरगाव : दिवाळीनंतर सुरू झालेल्या बाजार समित्यांमध्ये आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी कोपरगाव  बाजार समितीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती आणि ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी कांद्याची आवक वाढली!

कोपरगाव कृषी उत्पन्न   मुख्य बाजार आवारात सोमवारी ६०० ट्रॅक्टरमधून सुमारे ६  हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. येथे झालेल्या लिलावात उन्हाळ कांद्यास प्रतिक्विंटल किमान ४ हजार ते कमाल ४५०० (सरासरी ४२००) रुपये असा बाजारभाव मिळाला. सोमवारी  शिरसगाव तिळवणी उपबाजारात ५०० ट्रॅक्टर मधून पाच हजार क्विंटल कांदा  आवक आली तर उन्हाळ कांद्यास प्रतिक्विंटल मिळालेला किमान ३ हजार ८०० ते कमाल ४००० (सरासरी ३७००) रुपये हे बाजारभाव  आले  असल्याची   माहिती बाजार समितीच्या सभापती संभाजी रक्ताटे यांनी दिली .
 आवक वाढली, दर घटले खाली आल्याने कांद्याचे भाव आणखी किती पडणार? असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे.  बाजार समितीत कांद्याला जास्त भाव मिळेल या आशेने कांदा उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर कांदा आणला होता. मात्र उन्हाळी कांद्याला  कमी  भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. 
सोमवारी बाजारभाव पाच हजाराच्या पुढे जातील अशी अशा शेतकऱ्यांना होती. मात्र ही आशा फोल ठरली.  एकीकडे कोरोनाची येवू  पाहणारी दुसरी लाट आणि ढगाळ वातावरण काही ठिकाणी पडलेला पाऊस त्यात कांद्याचे अस्थिर भाव हा चिंतेचा विषय असल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page