शेतक-यांनो हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आजच सात नंबर फॉर्म भरा- शिवाजी ठाकरे 

शेतक-यांनो हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आजच सात नंबर फॉर्म भरा- शिवाजी ठाकरे 

To get the right water

“आता चोरी नको, हक्काचे घेऊ जो नडेल त्याला शिवसेना भिडेल”

कोपरगाव : शेतकऱ्यांनो आपल्या हक्काच्या पाण्यावर अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सात नंबर फॉर्म भरणे अत्यंत गरजेचा असून कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ३१ तारखेपर्यंत सात नंबर फॉर्म भरणे गरजेचे आहे.सदर फॉर्म भरतांना काही अडचणची आल्यास शेतकऱ्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन कोपरगाव शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केले आहे.“आता चोरी नको, हक्काचे घेऊ जो नडेल त्याला शिवसेना भिडेल” असा इशाराही त्यांनी दिला.

आजपर्यंत आपण मिळेल त्या मार्गाने पाणी घेत राहिलो त्यामुळे या पाण्याची नोंद सरकार दप्तरी झाली नाही. परिणामतः न्यायालयात आपली पाण्याची मागणी कागदपत्री कमी दिसल्याने आपल्याकडे जादा पाणी दिसू लागले ते मराठवाड्याने आपल्याकडून हिसकावून घेऊन आता त्यावर ते हक्क सांगू लागले आहेत. तेव्हा आता सावध व्हा यापुढे आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळालेच पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त संख्येने आणि मागणीसाठी सात नंबरचे फार्म भरा, म्हणजे  भविष्यात आपले पाणी कमी होणार नाही व आपल्याला  पाणी टंचाईचा सामना करावा  लागणार नाही. 
 त्यामुळे लाभक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांनी आणि पाणी वापर सोसायट्यांच्या लाभक्षेत्रातील जे सभासद नसतील अशाही शेतकऱ्यांनी हा फॉर्म भरणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत पर्जन्यमान चांगले आहे. मात्र भविष्य काळात समोर येणाऱ्या वाढीव पाण्याची गरज लक्षात घेता सात क्रमांकाचा फॉर्म हा काळजीपूर्वक भरा व आपल्या हक्काचे पाणी सुरक्षित ठेवा, असे आवाहन  शिवाजी ठाकरे यांनी कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने  केले आहे. तसेच काही अडचण भासल्यास शिवसेना पदाधिकारी व पक्ष कार्यकर्ते यांच्याशी  संपर्क साधावा
आपल्याला योग्य ती मदत केली जाईल असे  शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी सांगितले आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page