अ. भा. चित्रपट महामंडळ महिला ब्रिग्रेड सदस्यपदी वंदना बंदावणे, तर समारंभ समितीवर अंतून घोडके 

अ. भा. चित्रपट महामंडळ महिला ब्रिग्रेड सदस्यपदी वंदना बंदावणे, तर समारंभ समितीवर अंतून घोडके 

वृत्तवेध ऑनलाईन। Wed 25Nov2020,
By:RajendraSalkar,20:20

कोपरगाव : संगमनेर येथील नाट्य चित्रपट कलावंत वंदना बंदावणे व अंतून घोडके यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी विविध समित्यांवर निवड केली आहे.

वंदना बंदावणे यांची महिला ब्रिग्रेडच्या सदस्यपदी तर अंतून घोडके यांची समारंभ समितीच्या सदस्यपदी निवड केल्याचे पत्र पुणे येथे अध्यक्ष भोसले यांनी प्रदान केले. यावेळी महामंडळाचे समन्वयक अनिल गुंजाळ, समारंभ समिती प्रमुख दिग्दर्शक शार्दूल लिहिणे , ऍड. मंदार जोशी , निर्माते वसंत बंदावणे, निर्माते राजेश जोशी, कृष्णा परदेशी , निलेश जोशी , आनंद खुरे,व महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वंदना बंदावणे यांनी अनेक नाटक, चित्रपट, लघुचित्रपट, तसेच मालिकेत भूमिका केल्या आहेत.त्यांच्या बळीराणी या लघुचित्रपटाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.तर अभिनयाचे रौप्यपदक मिळाले आहे.
 अंतून घोडके हे कलाकारांच्या रंगकर्मी या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांनी अनेक चित्रपट, मालिका व लघुचित्रपटातून भूमिका केल्या असून अनेक लघुपटांची  निर्मिती केली आहे. रंगकर्मीचे ‘ शेवंता जित्ती हाय ‘ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाले आहे.
    राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात , आमदार व संग्रामचे अध्यक्ष डॉ.सुधीर तांबे ॲड.अण्णासाहेब शिंदे महामंडळाच्या सदस्या अभिनेत्री वर्षा उसगावकर  महामंडळाचे नगर जिल्हा प्रमुख शशिकांत नजान, जेष्ठ नाटककार डॉ.सोमनाथ मुटकुळे, सूर्यकांत शिंदे, भरारी पथक सदस्य ॲड.भाऊसाहेब गांडोळे, यांनी अभिनंदन केले आहे.
    चित्रपट महामंडळाने या नियुक्त्या करून अध्यक्ष भोसले यांनी संगमनेरच्या कलावंतांना प्रोत्साहन व न्याय दिल्याची भावना अनेक कलावंतांनी व्यक्त केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page