म्हशी चोरी प्रकरणात दीड लाखाच्या तीन म्हशीसह दोघांना पकडण्यात यश, एक फरार
Buffalo theft
RajendraSalkar।वृत्तवेध ऑनलाईन| Updated: 26Nov 2020, 17:30
कोपरगाव : कोपरगाव शहरातील गोठ्यातील म्हशी चोरून नेल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून एक जण मात्र फरार झाला आहे.
याबाबत कोपरगाव शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की कोपरगाव शहरातील गोकुरबाबा गल्लीत राहणारे अजहर इस्माईल शेख यांच्या सव्वालाख किमतीच्या दोन म्हशी मंगळवारी २४ रोजी रात्री ८ वाजेपासून ते बुधवारी २५ रोजी सकाळी सहा वाजे दरम्यान दोन म्हशी आकाश संजय रोकडे, हरीश चंद्रकांत कुऱ्हाडे, व सचिन गायकवाड सर्व राहणार खेडकर गल्ली कोपरगाव यांनी चोरून नेल्या असल्याची फिर्याद दिली होती. सदर फिर्याद खरी असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक अहमदनगर मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर दिपाली काळे उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी संजय सातव पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बारसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पुंड, पोलीस कॉन्स्टेबल सुरज अग्रवाल, पोना कोरेकर, पोका.शिंदे यांनी सापळा लावून व पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला, तर आरोपी सचिन गायकवाड हा पळून जाण्यात यशस्वी झाला आरोपी याची झडती घेतली असता त्यांच्याजवळ १६०००० किमतीच्या दोन जाफराबादी व एक गावरान अशा तीन म्हशी ताब्यात घेण्यात कोपरगाव शहर पोलिसांना यश आले आहे. तर या प्रकरणातील फरारी सचिन गायकवाड याच्या मागावर पोलीस आहेत.