कोपरगावात खोका शॉप वाद पेटला; शिवसेना आक्रमक

कोपरगावात खोका शॉप वाद पेटला; शिवसेना आक्रमक

Box shop dispute erupts in Kopargaon; Shiv Sena aggressive

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देताना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक

खोका शॉप बांधा, अन्यथा “जो नडेल त्याला शिवसेना भिडेल”

RajendraSalkar।वृत्तवेध ऑनलाईन| Updated: 26Nov 2020, 18:30

कोपरगाव : गेल्या आठवड्यात व्यापारी संघर्ष समितीने विस्थापितांचे पुनर्वसन खोका शॉप  या प्रश्नावर आंदोलन सुरू केल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आणि एक राजकीय भांडवल म्हणून पाठिंबा देण्याची सर्वच राजकीय पक्षात स्पर्धा सुरू झाली. यात आता शिवसेनेने उडी घेतली आहे. या प्रश्नावरून शिवसेनेने थेट पालिका प्रशासनाला टार्गेट केले असून तातडीने खोका शॉप बांधा, अन्यथा “जो नडेल त्याला शिवसेना भिडेल” सज्जड दमच निवेदनाद्वारे दिला आहे.

सन २०११ साली अनेक छोट्या व्यापाऱ्यांचे व टपरी धारकांचे अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. गेल्या अनेक वर्षांपासून हा संवेदनशील विषय प्रलंबित आहे. शिवसेनेने सभागृहात ठराव मंजूर केला आहे. गेल्या चार वर्षात खोका शॉप बाबत कुठलीही हालचाल झाली नाही. कोपरगाव नगरपालिकेला वारंवार या बाबत निवेदने देण्यात आले तसेच अनेक आश्वासने मिळाली, परंतु प्रत्यक्ष कारवाई झालीच नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे . सर्व राजकारण्यांनी एकत्र येऊन टपरी धारकांचा प्रश्न मार्गी लावावा म्हणजे कोपरगावची बाजार पेठ विकसित होईल. पुन्हा सर्वनुमते ठराव मंजूर करून खोका शॉप बांधण्याचा निर्णय घ्यावा. यात दिरंगाई झाली तर शिवसेना स्टाइलने जाब विचारला जाईल. गरजूंना न्याय देण्यासाठी शिवसेना कायमच त्यांच्या पाठीशी उभी राहिल. असेही निवेदनात नमूद केले आहे.

गेल्या आठवड्यात व्यापारी संघर्ष समितीने या प्रश्नावर आंदोलन सुरू केल्याने पुनर्वसनावरून निर्माण झालेला वाद आता पेटला आहे. काही झाले तरी विस्थापितांना न्याय मिळवून देणारच, जनतेला न्याय देणे हे आमच्या रक्तातच आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झाले तरी त्याची फिकीर नाही, असा इशारा आज शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिलेल्या शिवसेना निवेदनातून दिला.

यावेळी मा.नगराध्यक्ष संजय सातभाई, विधानसभा संघटक अस्लम शेख, वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, नगरसेविका वर्षा शिंगाडे,उपशहरप्रमुख विकास शर्मा,प्रफुल्ल शिंगाडे,भूषण पाटणकर,गगन हाडा,गोपाळ वैरागळ, आकाश कानडे,युवानेते विक्रांत झावरे, संघटक नितीन राऊत,बाळासाहेब साळुंके, व्यापारी सेनेचे योगेश मोरे, वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख पप्पू पेकले, उपतालुकाप्रमुख अविनाश धोक्रट, ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे,सतीश शिंगाणे, पप्पू देशमुख, विशाल झावरे प्रमोद बोथरा आदीसह आधीचे शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.

कोट
 दहा वर्षांपूर्वी कोपरगाव शहरातील अतिक्रमणे पालिका प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्तामध्ये हटविल्यानंतर विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्नाचा फुटबॉल झाला, केवळ राजकीय भांडवल म्हणून पोळी भाजण्याचे काम झाले. परंतु गेल्या आठवड्यात व्यापारी संघर्ष समितीने या प्रश्नावर आंदोलन सुरू केल्याने पुन्हा  हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेचे पडघम कानात घुमू लागल्याने पुनर्वसनावरून निर्माण झालेला वाद आता पेटला आहे. सर्वच राजकीय पक्षांत पाठिंबा देण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. गेल्या चार वर्षात या रिकाम्या जागेवर पुन्हा अतिक्रमण झालेले आहे. परंतु याबाबत मात्र कोणीही बोलण्यास तयार नाही. धूळ खड्डे आणि आरोग्य या बाबतीत कमनशिबी असलेल्या कोपरगावकरांना आता वाहतूक कोंडी आणि पार्किंग या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचा कुठेही विचार होताना दिसत नाही. मी खरेच दुर्दैव आहे!

Leave a Reply

You cannot copy content of this page